गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या (Corona) पार्श्वभुमिवर गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) थाटामाटात साजरा झाला नाही. पण यावर्षी मात्र देशभरात गणेशोत्सव (Ganeshotsav) दणक्यात साजरा होत आहे. त्यात मुंबईचा (Mumbai Ganeshotsav) गणेशोत्सव म्हणटलं की पर्वणीचं. आज लाडक्या बाप्पाचं घरोघरी आगमन झालेलं आहे. तरी उद्यापासून दीड दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जनाला (Ganpati Visarjan) सुरुवात होईल. मुंबईतील (Mumbai) विविध भागात विसर्जनासाठी कृत्रीम तलावांची (Artificial Lakes) निर्मिती करण्यात आली आहे. तरी दक्षिण मुंबई (South Bombay) भागात समुद्रकिनारा लाभला असल्याने या भागातील घरगुतीसह मंडळाच्या गणपतींचं समुद्रावर विसर्जन केल्या जाते. दादर चौपाटी (Dadar Chaupati), गिरगाव चौपाटी (Girgaon Chaupati) या भागात मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जन होते. तरी गेट वे ऑफ इंडिया (Gateway Of India) परिसरात मात्र विसर्जनास बंदी करण्यात आली होती तरी प्रशासनाकडून आता ही बंदी उठवण्यात आली आहे.
गेट वे ऑफ इंडिया (Gateway Of India) येथील समुद्राची खोली कमी असल्याने गणेशमूर्तींचे विसर्जित (Visarjan) अवशेष वर येतात आणि समुद्राच्या तळाशी गाळ साचतो. त्यामुळे बोटींचे अपघात होण्याचा धोका असल्याची भीती व्यक्त करत पोर्ट ट्रस्ट प्रशासनाने 'गेट वे' परिसरात विसर्जनास परवानगी नाकारली होती. पण मुंबई महापालिकेने (BMC) विसर्जनासाठी आवश्यक उपाययोजना करत विसर्जनानंतर समुद्रातील गाळ काढून देण्याची हमी दिलेली आहे. म्हणून गेट वे ऑफ इंडिया येथील समुद्रात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास अखेर मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रशासनाने परवानगी दिली आहे. (हे ही वाचा:- Ganeshotsav 2022: गणेशोत्सवानिमित्त मध्यरात्री देखील पश्चिम, हार्बर आणि मध्य मार्गावर विशेष लोकल धावणार, रेल्वे प्रशासनाची माहिती)
गेले काही दिवसांपूर्वीच सुरक्षेच्या पार्श्वभुमिवर गणेशोत्सवा दरम्यान गेट वे ऑफ इंडिया परिसरात पर्यटकांना बंदी घोषीत करण्यात आली होती. तरी प्रशासनाकडून विसर्जनाचा हा निर्णय कितपत योग्य ठरेल हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. या निर्णयाने कुलाबा, कफ परेड, फोर्ट येथील घरगुती व सार्वजनिक मंडळांना दिलासा मिळाला आहे.