मुंबईच्या गणशोत्सव मंडळातील मानाचे स्थान असणाऱ्या लालबागच्या राजावर (Lalbaugcha Raja) भाविकांची अपार श्रद्धा आहे, या निष्ठेपोटी हे भाविक तासंतास दर्शनाच्या रांगेत उभे राहतात. यथाशक्ती आपल्या लाडक्या बाप्पाच्या चरणी दान देखील करतात. पण यंदा एका भाविकाने लालबागच्या राजाच्या चरणी चक्क सोन्याचे ताट, वाट्या आणि चमचे भेटरूपात अर्पण केले आहेत. खास सूत्रांच्या माहितीनुसार या वस्तूंची किंमत तब्बल 47 लाख रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे.या अज्ञात भाविकाने गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 1 किलो 237 ग्रामचे 22 कॅरेट सोन्याचे ताट, वाटी, चमचे, ग्लास लालबागच्या राजाच्या चरणी वाहिले. याशिवाय अन्य काही भाविकांपैकी कोणी अमेरिकन डॉलर सोन्या चांदीचे दागिने, मोदक अशाही वस्तू भेटस्वरूपात अर्पण केल्या आहेत.पहा लालबागच्या राजाचे लाईव्ह दर्शन
मागील वर्षी सुदधा सहाच एका भाविकाने लालबागच्या राजाला 1 किलो 101 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन मूर्ती अर्पण केल्या होत्या. या दोन्ही मूर्तींची किंमत सुमारे 31 लाख 51 हजार रुपये एवढी होती. मागील कित्येक वर्ष या वस्तूंचा साधारणतः या गणेशोत्सवानंतर लिलाव केला जातो, ज्यात गणेशभक्त उत्साहाने सहभाग घेतात. (Ganeshotsav 2019 Mumbai Traffic Advisory: गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी दरम्यान मुंबई मध्ये वाहतुकीच्या मार्गात बदल; पहा पुढील 10 दिवस कोणते मार्ग असतील बंद)
दरम्यान, यंदा लालबागच्या राजा मंडळाचे 86 वे वर्ष आहे. लालबागच्या मार्केट मध्ये विराजमान झालेल्या या बाप्पाच्या सभोवताली यंदा नितीन चंद्रकांत देसाई यांनी ‘चांद्रयान 2’चा आगळावेगळा देखावा उभा केला आहे. भारताची चांद्रयान मोहीम आणि गणेशोत्सवाचा सोहळा याचा मेळ घालत हा देखावा साकारण्यात आला आहे. अंतराळवीर, मिसाईल्स यांचं मधोमध विराजमान बाप्पाला पाहिल्यावर आपणही अंतराळात असल्याचा भास होतो.