Ganpati (Photo Credits: Instagram)

मुंबईत (Mumbai) आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभुमीवर गणेशोत्सवादरम्यान नागरिकांची गर्दी आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यासाठी प्रत्येक वर्षी मुंबई पोलिसांकडून वाहतुकीच्या मार्गात बदल केले जातात. तर यंदासुद्धा वाहतुक कोंडीचा सामना मुंबईकरांना करावा लागू नये म्हणून पोलिसांनी एक पत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त मुंबई मध्ये वाहतुकीच्या मार्गात गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत बदल केले आहेत.

मुंबई पोलिसांनी ट्वीट करत गणेशोत्सवादरम्यान मुंबई मधील कोणत्या वाहतूकीच्या मार्गात बदल केले आहेत याबाबात अधिक माहिती दिली आहे. तसेच मुंबईतील लोअर परेल, चिंचपोकळी, लालबाग या ठिकाणच्या परिसरात सार्वजनिक गणपतींची संख्या अधिक आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियोजन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तर येथे जाणून घ्या तारखेनुसार कोणत्या दिवशी वाहतुकीच्या मार्गात बदल केले आहेत.(गणेशोत्सव काळात होणाऱ्या गर्दीमुळे आजाराचे प्रमाण वाढण्याची शक्यता, लेप्टो आणि स्वाइन फ्लू नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिकेकडून नागरिकांना आवाहन)

मुंबई पोलीस ट्वीट:

महाराष्ट्रासह देशभरात आणि जगभर पसरलेले गणेशभक्त गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी अशा 10 दिवसांच्या काळात गणेशोत्सव साजरा करतात. आराध्य दैवत समजल्या जाणार्‍या गणरायाला शुभ कार्यात प्रथम स्थान देण्यात आलं आहे. त्यानुसार, विघ्नहर्ता, संकटमोचक असणार्‍या गणपती बाप्पाच्या आराधननेने सारी संकंट, दु:ख दूर होतात अशी गणेशभक्तांची श्रद्धा आहे.