गणेशोत्सव काळात होणाऱ्या गर्दीमुळे आजाराचे प्रमाण वाढण्याची शक्यता, लेप्टो आणि स्वाइन फ्लू नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिकेकडून नागरिकांना आवाहन
Ganpati Festival (Photo Credits-Facebook)

राज्यभरात गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) सणाला आजपासून सुरुवात झाली आहे. गणेशोत्सावेळी नागरिकांची फार प्रचंड गर्दी दिसून येते. मात्र गर्दीच्या ठिकाणी आजाराचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे मुंबई महापालिकेने लेप्टो आणि स्वाइन फ्लू या सारख्या गंभीर आजारापासून दूर राहण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या दोन महिन्यात डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लू, हेपेटायटिस आणि गेस्ट्रो या आजाराचे रुग्ण कमी आढळून आले आहेत. मात्र लेप्टोच्या रुग्णांची संख्या फार असल्याचे दिसून आले आहे. तर मुंबई मध्ये आता पर्यंत 3 जणांचा लेप्टोमुळे मृत्यू झाला आहे.

तसेच यंदा स्वाइन फ्लू आजाराचे 36 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. यामुळे लेप्टो आणि स्वाइन फ्लू सारख्या गंभीर आजारापासून दूर राहण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे महापालिकेने सांगितले.(Ganesh Chaturthi 2019 Special Ukdiche Modak: गणपती बाप्पाचा आवडीचा नैवेद्य उकडीचे मोदक घरच्या घरी झटपट कसे बनवाल? Watch Video)

त्याचसोबत लेप्टो आणि स्वाइन फ्लू सारख्या अन्य आजारांपासून दूर राहण्यासाठी गरम पाणी प्यावे. तसेच ताप आल्यासारखे वाटल्यास तो अंगावर न काढता डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्यावा. कचऱ्याच्या ठिकाणी जाणे टाळावे.