FYJC Admission | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

इयत्ता आकरावी (FYJC Admission 2021-22) प्रवेश घेतेवेळी होणारा गोंधळ आणि किचकट प्रक्रियेतून मार्ग काढण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने एक नामी उपाय शोधला आहे. इयत्ता आकरावी (XI Class Admission) प्रवेशासाठी महामंडळाकडून एका मोबाईल अ‍ॅपची (मोबाईल अ‍ॅप, Mobile App For FYJC Admission) निर्मिती करण्यात आली आहे. पीओइएएम असे या अ‍ॅप चे नाव आहे. POEAM App च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इयत्ता आकरावीत घरबसल्या प्रवेश मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी ही माहिती दिली. वर्षा गायकवाड यांनी याबाबत एक ट्विटही केले आहे.

राज्यातील कोरोना व्हायरस संसर्गाची स्थिती आणि संक्रमनाचा वाढता धोका विचारात घेता विद्यार्थी, पालक आणि एकूणच शैक्षणिक वर्तुळासाठी हे अ‍ॅप फायदेशीर ठरणार आहे. कोरोना काळात होणारी गर्दी टाळण्यासाठी हे अ‍ॅप विशेष लाभदारी ठरणार आहे. हे अ‍ॅप विद्यार्थ्यांसाठी गूगल प्ले स्टोअर आणि आयओएस प्रणालीवरही उपलब्ध होणार असल्याचे शिक्षणंमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. गूगल प्ले स्टोअरवरुन हे अॅप डाऊनलोड करुन विद्यार्थ्यांना घरच्या घरी प्रवेश घेणे सोपे जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे दीर्घ प्रवास करुन भल्या मोठ्या रांगेत उभे राहून प्रवेश मिळविण्याच्या त्रासापासून विद्यार्थ्यांची मोठी सूटका झाली आहे. (हेही वाचा, MPSC Twitter Handle: महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालयाचे एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी अधिकृत ट्विटर हँडल)

वर्षा गायकवाड

इयत्ता आकरावी प्रवेशाची पहिली यादी शुक्रवारी जाहीर झाली. पहिल्या फेरीत सुमारे 1,17,883 विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या पसंतीक्रमानुसार महाविद्यालयीन प्रवेश मिळाला. अंतर्गत मुल्यमापण पद्धतीमुळे इयत्ता दहावीचा निकाल आणि विद्यार्थ्यांच्या गुणांतही संख्यात्मक वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा प्रवेशासाठी तीव्र स्पर्धा राहिल असा कयास होता. तरीही मुंबई आणि महानगर परिसरात कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश पात्रता गुणांमध्ये (कट ऑफ) फारसा फरक पडला नाही. काही महाविद्यालयांतर पाठिमागील वर्षापेक्षाही पात्रता गुण घटल्याचे पाहायला मिळाले आहे.