चर्चा त्यांच्या मैत्रीची (Friendship) पंचक्रोशीत रंगली आहे. या चर्चेची दखल प्रसारमाध्यमांनीही घेतली आहे. ही चर्चा केवळ मैत्रीचीच नव्हे तर मैत्रीला स्मरुन दिलेल्या अनोख्या भेटीचीही आहे. होय, ते दोघे आहेत नाशिक (Nashik) जिल्ह्यातील इकतपूरी (Igatpuri) तालुक्यातील गोंदे दुमाला (Gonde Dumala) गावातील. दोघांपैकी एकाचे नाव आहे रुपेश हरिश्चंद्र नाठे आणि दुसऱ्याचे नाव आहे डॉ. हृषीकेश प्रदीप मुधळे. दोघांच्या मैत्रीची आणि त्यात दिलेल्या भीचे कारण असे की, मित्रप्रेमापोठी एका मित्राने चक्क दुसऱ्या मित्राला चंद्रावर (Moon) एक एकर जमीन घेऊन दिली आहे. वाचा काय आहे प्रकार.
रूपेश हरिश्चंद्र नाठे आणि डॉ. हृषीकेश प्रदीप मुधळे हे एकमेकांचे घनिष्ट मित्र. दोघांच्या कुटुंबामध्येही चांगला जिव्हाळा. याच जिव्हाळ्यातून डॉ. हृषीकेश प्रदीप मुधळे आणि त्यांच्या कुटुंबाने वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या रूपेश हरिश्चंद्र नाठे चक्क चंद्रावर 1 एकर जमीन भेट स्वरुपात दिली आहे. ही भेट केवळ मैत्रीखातर आहे बरं. (हेही वाचा, Sex With Friend's Brother: Porn Star Abella Danger ने ठेवले आपल्या अनेक मित्रांच्या भावांसोबत लैंगिक संबंध; आता तुटली आहे सर्वांसोबतची मैत्री (Watch Video))
डॉ. मुधळे व कुटुंबाने नाठे यांना दिलेल्या अनोख्या भेटीबद्दल सांगितले की, चंद्रावरील जमीन खरेदीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या व्यवहाराबाबत आवश्यक प्रक्रिया इंटरनॅशनल लुनार लॅण्ड्स अथॉरिटी यांच्याकडे पूर्ण करण्यात आली आहे. रुपेशनाठे यांनी गोंदे येतून छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी महाराष्ट्रात प्रथमच सुरु केली आहे. आपल्या मित्राचा विविध सामाजिक कार्यामध्ये असलेला सहभाग पाहून आपण त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून ही भेट दिल्याचे डॉ. मुधळे आणि त्यांचे कुटुंबीय सांगतात.