Gajanan Babar | (File Image)

शिवसेनेचे (Shiv Sena) माजी खासदार गजानन बाबर (Gajanan Babar) यांचे यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले. पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी 11 वाजता निगडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यंतसंस्कार केले जाणार आहेत. गजानन बाबर (Gajanan Babar Passes Away) हे सच्चा शिवसैनीक होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने पुणे शिवसैनिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पाठिमागील काही दिवसांपासून गजानन बाबर हे प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त होते. त्यांना पोटविकार होता. नुकतेच त्यांना पोटावरील उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांमुळे त्यांच्या प्रकृतीत पाठीमागील आठवड्यात सुधारणाही झाली होती. महत्त्वाचे म्हणजे 26 जानेवारी रोजी झालेल्या बँकेतील ध्वजारोहनासही ते उपस्थित राहिले होते. मात्र, बुधवारी पुन्हा एकदा त्यांची तब्येत अचानक बिघडली.

गजानन बाबर यांना प्रकृती बिघडल्याने बुधवारी पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्या आले. त्यांच्यावर पिंपरी चिंचवड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना बाणेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. गजानन बाबर यांच्यावर 1997 मध्ये पहिल्यांदा बायपास सर्जरी झाली होती. पुढे 1999 मध्ये त्यांच्या गुडघ्यावरही शस्त्रक्रिया झाली. तर 2014 मध्ये त्यांच्या मणक्याची शस्त्रक्रिया झाली. इतक्या वेळा आघात होऊनही ते पुन्हा एकदा मोठ्या तडफेने उभा राहिले. मात्र, पोटाच्या विकाराने त्यांना त्या तडफेने उभा राहू दिले नाही. या आजारातच त्यांचे निधन झाले. (हेही वाचा, महाविकास आघाडी सरकार हेच यापुढे महाराष्ट्राचे राजकीय भविष्य; Shiv Sena आणि BJP पुन्हा एकत्र येणार नाहीत- MP Sanjay Raut)

गजानन बाबर हे 1974 पासूनच शिवसेनेशी जोडले गेले. त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये प्रथम शिवसेना शाखा स्थापन केली. या शाखेचे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी उद्घाटन केले होते. त्यानंतर गजानन बाबर यांचा राजकीय आलेख वाढत गेला. ते पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातही कार्यरत झाले. महापालिकेत ते तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेतेपदही भूषवले. 1955 आणि 1999 अशा दोन वेळी हवेली विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा ते शिवसेना तिकीटावर आमदार झाले. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाले. दरम्यान, त्यांनी शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख पदाचाही कार्यभार सांभाळला.

नवनिर्वाचीत असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातून 2009 मध्ये ते खासदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले. सातारा येथील किसनवीर सहकारपी साखर कारखान्याचे ते प्रदीर्घ काळ संचालक होते. दरम्यान 2014 मध्ये शिवसेनेने त्यांना तिकीट नाकारुन त्या ऐवजी श्रीरंग बारणे यांना तिकीट दिले. त्यानंतर ते सक्रीय राजकारणातून बाजूला गेले. दरम्यान, नाराज होऊन त्यांनी मनसेत प्रवेश केला. मात्र, पिंपरी-चिंचवड संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी भेट घेतल्यानंतर त्यांची नाराजी दूर झाली आणि ते पुन्हा शिवसेनेत दाखल झाले.