Mumbai Traffic Police Constable Jumps Into Sea To Save Woman (फोटो सौजन्य - X/@MTPHereToHelp)

Mumbai Traffic Police Constable Jumps Into Sea To Save Woman: मुंबई वाहतूक पोलिस कॉन्स्टेबलने (Mumbai Traffic Police Constable) समुद्रात उडी मारणाऱ्या एका अज्ञात महिलेला वाचवण्यासाठी स्वत: समुद्रात उडी घेतली आणि महिलेचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. ही घटना 12 मे रोजी घडली. भिकाजी गोसावी (Bhikaji Gosavi), असं या धाडसी पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे. ही घटना कफ परेड येथील बी.डी. सोमाणी जंक्शनजवळ घडली. पी.सी. गोसावी ड्युटीवर असताना त्यांनी एका अज्ञात महिलेला समुद्रात उडी मारताना पाहिले.

दरम्यान, वेळ वाया न घालवता, त्यांनी तात्काळ नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली आणि नंतर महिलेला वाचवण्यासाठी त्यांनी पाण्यात उडी मारली. त्यांनी महिलेपर्यंत पोहोचून तिला बाहेर काढले. किनाऱ्यावर आणल्यानंतर, त्यांनी महिलेला वाचवण्यासाठी सीपीआर दिला. दुर्दैवाने, त्यांच्या धाडसी प्रयत्नांना न जुमानता, महिलेला नंतर रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.

पी.सी. गोसावी यांच्या जलद आणि धाडसी कृतीचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे. दुसऱ्याचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला. मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) अकाउंट @MTPHereToHelp वर ही घटना शेअर केली आणि कॉन्स्टेबलने दाखवलेल्या धाडसाचे कौतुक केले. (वाचा - Car Plunges Into Chaliyar River: चालकाने रिव्हर्स गियर टाकला अन्...कार फेरीत चढण्याऐवजी थेट नदीत कोसळली; पहा व्हिडिओ)

मुंबई वाहतूक पोलिस कॉन्स्टेबलने महिलेला वाचवण्यासाठी मारली समुद्रात उडी - 

तथापि, अनेक नागरिकांनी मुंबई पोलिसांच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देत या धाडसी कृतीचे कौतुक केले. एका वापरकर्त्याने म्हटलं आहे की, 'शाब्बास पीसी भिकाजी गोसावी, आम्हाला तुमचा अभिमान आहे. निरोगी राहा - मुंबईच्या पावसात आम्हाला पुन्हा तुमची गरज पडू शकते.'