Minister Vijay Shah (फोटो सौजन्य - X/@sanjaygupta1304)

Minister Vijay Shah on Sofia Qureshi: मध्य प्रदेशातील एका मंत्र्याने 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) संदर्भात ब्रीफिंग देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी (Colonel Sophia Qureshi) यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. मंत्री विजय शाह (Vijay Shah) यांनी सोफिया कुरेशीला 'पाकिस्तानी आणि दहशतवाद्यांची बहीण' म्हटले. त्यांच्या या विधानानंतर देशातील राजकारण तापले असून, आता सामान्य नागरिकही त्यांना लक्ष्य करत आहेत आणि त्यांच्यावर टीका करत आहेत. त्यांचे हे विधान सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

मध्य प्रदेशातील मोहन यादव सरकारमधील मंत्री कुंवर विजय शाह सोमवारी महू विधानसभेतील मानपूरच्या पंचायतीत आयोजित कार्यक्रमाला संबोधित करत होते. सोफिया कुरेशीचे नाव न घेता त्यांनी सांगितले की, 'ज्यांनी (पाकिस्तानी दहशतवाद्यांनी) आमच्या मुलींचे सिंदूर नष्ट केले होते, आम्ही त्यांच्याचं बहिणीला त्यांचा बदला घेण्यासाठी पाठवले. त्यांनी आमच्या हिंदूंना कपडे काढून मारहाण केली आणि मोदीजींनी त्यांच्या बहिणीला त्यांना मारहाण करण्यासाठी त्यांच्या घरी पाठवले. मोदीजींना कपडे काढता आले नाहीत, म्हणून त्यांनी त्यांच्या समुदायातील एका बहिणीला पाठवले आणि सांगितले की तुम्ही आमच्या बहिणींना विधवा बनवले आहे, त्यामुळे तुमच्या समुदायाची बहीण येऊन तुम्हाला नग्न करेल.' (वाचा - (हेही वाचा -PM Modi On Operation Sindoor: 'अणुशक्तींची धमकी भारत सहन करणार नाही' म्हणत नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिले 3 मोठे इशारे)

विजय शाह यांनी पुढे म्हटलं आहे की, पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, ते सिंदूर पुसणाऱ्यांना घरात घुसून मारतील. हे फक्त 56 इंचाची छाती असलेला माणूसच करू शकतो. आम्हाला अभिमान आहे की आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. आम्ही सुरक्षित आहोत.

मंत्री विजय शाह यांची कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी -

विजय शाह यांचे हे भाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडिया वापरकर्ते मंत्र्यांच्या विधानावर टीका करत आहेत. विजय शाह यांच्या तोंडून अपशब्द निघण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2013 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, 14 एप्रिल रोजी त्यांनी झाबुआ येथे आयोजित एका सरकारी कार्यक्रमात त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या पत्नीवर दुहेरी अर्थाची टिप्पणी केली होती.