
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या (Operation Sindoor) माध्यामातून घेतला असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी भारताच्या सशस्त्र दलाचं कौतुक करत त्यांच्या शौर्याला सलाम केला आहे. दहशतवाद्यांनी आमच्या बहिणींचे सिंदूर पुसलं, म्हणून भारताने दहशतवादाचे मुख्यालय उद्ध्वस्त केले. हे ऑपरेशन देशातील महिला, माता आणि बहिणींना समर्पित आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदुरची माहिती देताना त्यांनी अजूनही ऑपरेशन सिंदूर थांबलं नसल्याचं म्हटलं आहे. सध्या हे केवळ स्थगित करण्यात आलं असून आता पाकिस्तानच्या लहान लहान पावलांवरही आपलं लक्ष असेल आणि दहशतवादी कारवाई केल्यास त्याला जसाच तसे उत्तर दिले जाईल असे पीएम मोदी यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी पीएम मोदी यांनी पाकिस्तानला 3 मोठे इशारे दिले आहे.
पीएम मोदींचे पाकिस्तानला 3 मोठे इशारे
अणुशक्तींच्या धमकींना घाबरणार नाही
#WATCH | #OperationSindoor | In his address to the nation, PM Modi says, "...No nuclear blackmail will be tolerated anymore..."
He says, "Terrorist attack on India will have to face a befitting reply, and the response will be on our terms" pic.twitter.com/2DmGVrPI42
— ANI (@ANI) May 12, 2025
भारत अणुशक्तींच्या धमकीला यापुढे सहन करणार नसल्याचं पीएम मोदींनी ठणकावून सांगितलं आहे. अणुयुद्धाच्या धमकीच्या आडून केला जात असलेला दहशतवाद आणि पाकिस्तानचे त्यांना समर्थन यापुढे भारताकडून सहन केले जाणार नाही असे मोदींनी स्पष्ट जाहीर केले आहे.
दहशतवादी कारवाईंना जसाच तसं उत्तर देणार
पीएम मोदी यांनी आजचं युग युद्धाचं नक्कीच नाही पण ते दहशतवादाचं देखील नसेल त्यामुळे समोरून दहशतवादी कारवाई झाली तर भारत आमच्या अटीशर्थींवर दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी ठोस आणि मोठी पावलं घेण्यासाठी घाबरणार नसल्याचं मोदींनी म्हटलं आहे.
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान मधील दहशतवादी तळ उद्धवस्त करण्यात आले आहेत. या मध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले आहेत.
दहशतवाद्यांना आणि त्यांना पाठिशी घालणार्यांना वेगवेगळं पाहणार नाही
भारत आता दहशतवाद्यांना आणि त्यांना पाठिशी घालणार्या सरकारला वेगवेगळं पाहणार नाही . ऑपरेशन सिंदूर मध्ये जगाने पाहिलं की दहशतवाद्यांना अंतिम निरोप देताना तिथे पाकिस्तानी सैन्यातील अधिकारी उपस्थित होते. हा जगाला मिळालेला 'स्टेट स्पॉन्सर दहशवादाचा' पुरावा आहे. आम्ही आता भारत देश आणि नागरिकांना वाचवण्यासाठी आवश्यक ती सारी कठोर पावलं उचलणार आहोत. नक्की वाचा: भारताने पाकिस्तानच्या Kirana Hills मधील अणुऊर्जा प्रकल्प ला लक्ष्य केले? पहा IAF चा खुलासा.
ऑपरेशन सिंदूरने आता भारताची दहशतवादा विरूद्धची भूमिका अधिक मजबूत केली आहे असं मोदींनी म्हटलं आहे. आता पाकिस्तान सोबत बोलणी केवळ पीओके वरून होईल, दहशतवादा विरूद्ध होईल त्यामुळे एकाच धरणातून आता रक्त आणि पाणी वाहणार नाही, ट्रेड आणि टॉक होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केलं आहे.