हथिजन सर्कल येथील राधे रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या प्रतीक दाभी यांची 4 महिने 17 दिवसांची मुलगी ऋषिका हिला तिची मावशी मांडीवर घेऊन बसली होती. त्याच वेळी, जवळच राहणारी एक महिला तिच्या रॉटविलर पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी बाहेर आली. ती महिला फोनवर बोलत असताना कुत्र्याचा पट्टा तिच्या हातातून निसटला आणि कुत्र्याने चिमुरडीवर हल्ला केला.
...