
Indian Students Dies In Car Accident In America: अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथे झालेल्या कार अपघातात (Accident) दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्यांची गाडी झाडाला आणि नंतर पुलाला धडकल्याने हा अपघात झाला. शनिवारी सकाळी झालेल्या अपघातात गाडीच्या पुढच्या सीटवर बसलेला एक प्रवासी जखमी झाला तर दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू (Indian Students Dies In Car Accident) झाला. न्यू यॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने याबाबत पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, 'क्लिव्हलँड स्टेट युनिव्हर्सिटीचे दोन भारतीय विद्यार्थी, मानव पटेल (20) आणि सौरव प्रभाकर (23) यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. ही बातमी ऐकल्यानंतर खूप दुःख झाले.'
कार अपघातात 2 भारतीयांचा मृत्यू -
वाणिज्य दूतावासाने म्हटले आहे की, या कठीण काळात आमच्या संवेदना आणि प्रार्थना त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. वाणिज्य दूतावास कुटुंबियांच्या संपर्कात आहे असून कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. LancasterOnline.com च्या वृत्तानुसार, शनिवारी सकाळी 7 वाजता ब्रेकनॉक टाउनशिपमधील पेनसिल्व्हेनिया टर्नपाइकवर झालेल्या कार अपघातात या तरुण विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. (हेही वाचा - जॉर्जियामध्ये कार उलटल्याने 3 भारतीय-अमेरिकन विद्यार्थ्यांचा मृत्यू, 2 जखमी)
याआधी अमेरिकेतील मिलवॉकीमध्ये एक वेदनादायक अपघात घडला होता. रविवारी येथील एका अपार्टमेंटमध्ये लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. मदर्स डेच्या दिवशी सकाळी 8 वाजण्याच्या आधी लागलेल्या या आगीत अनेक जण किरकोळ जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा - Indian Student Dies in US: आंध्र प्रदेशातील 25 वर्षीय पशुवैद्यकीय विद्यार्थिनीचा अमेरिकेतील ओक्लाहोमा राज्यात कार अपघातात मृत्यू)
मिलवॉकी अग्निशमन दलाचे प्रमुख आरोन लिपस्की यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आगीमुळे 85 अपार्टमेंट असलेल्या इमारतीचे मोठे नुकसान झाले असून सुमारे 200 लोक तेथून विस्थापित झाल्याचा अंदाज आहे. लिपस्की म्हणाले की, या घटनेत सुमारे 30 जणांना वाचवण्यात आले असून आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.