High Salary Career Options | (Photo credit: archived, edited, representative image)

दहावीच्या परीक्षेत अपयश (Career After 10th Fail) आले तरीही भविष्यात यश मिळवता येते. जे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी दहावी उत्तीर्ण होऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी पारंपरिक शिक्षणाशिवाय अनेक व्यावसायिक आणि कौशल्याधारित संधी उपलब्ध (What To Do After 10th Fail) आहेत. शासकीय प्रशिक्षण, खासगी कोर्सेस, स्वयंपूर्ण व्यवसाय आणि ऑनलाइन कौशल्ये याच्या माध्यमातून चांगले करिअर घडवता येते. त्यामुळे तुम्ही अनुत्तीर्ण झाला असला तर मुळीच खचून जाऊ नका. हे अपयश केवळ तत्कालीक आहे. ते चिरंतन टिकणारे नाही. आपण आपले कष्ट आणि योग्य प्रशिक्षण, नियोजन याच्या आधारे करीअरमध्ये अनेक नानाविध संधी मिळवू शकता. खाली अशाच काही व्यवहार्य पर्यायांची माहिती देण्यात आली आहे, जे दहावी नापास विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतात.

सरकारी मान्यताप्राप्त व्यवसाय प्रशिक्षण कोर्सेस

दहावी नापास विद्यार्थ्यांसाठी आयटीआय (ITI) आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) यांच्यामार्फत विविध कौशल्याधारित कोर्सेस दिले जातात. हे कोर्स अल्पकालीन असून रोजगाराभिमुख असतात.

इलेक्ट्रिशियन

प्लंबर

वेल्डर

संगणक हार्डवेअर व नेटवर्किंग

टेलरिंग व फॅशन डिझायनिंग

मोबाईल रिपेअरिंग

एसी व फ्रिज तंत्रज्ञ

कौशल्याधारित नोकऱ्या व अप्रेंटिसशिप

दहावी नापास विद्यार्थ्यांना अनेक क्षेत्रांमध्ये प्रशिक्षणासह नोकरी करता येते:

दुचाकी किंवा कार मेकॅनिक

सलून असिस्टंट किंवा ब्युटीशियन

फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी सहाय्यक

बांधकाम क्षेत्रात मदतनीस

कारपेंटर, पेंटर किंवा फॅब्रिकेटर

हे व्यवसाय हळूहळू अनुभव वाढवत चांगल्या कमाईच्या संधी निर्माण करतात.

स्वयंरोजगार व उद्योजकता

कमी गुंतवणुकीतही अनेक मुलांनी छोटे व्यवसाय सुरू करून यश मिळवलं आहे:

फूड स्टॉल किंवा टिफिन सेवा

टेलरिंग किंवा एम्ब्रॉयडरी दुकान

मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक्स रिपेअरिंग

ड्रायव्हिंग किंवा डिलिव्हरी सेवा

घरगुती उत्पादनांची विक्री

या व्यवसायांसाठी कोणत्याही शैक्षणिक अर्हतेची आवश्यकता नसते.

ऑनलाईन कोर्सेस आणि डिजिटल कौशल्ये

युट्युब, गुगल आणि स्किल इंडिया यांसारख्या प्लॅटफॉर्मवरून फ्री किंवा कमी दरात डिजिटल कोर्सेस करता येतात:

ग्राफिक डिझायनिंग

डिजिटल मार्केटिंग

डेटा एन्ट्री

व्हिडिओ एडिटिंग

सोशल मीडिया मॅनेजमेंट

ब्लॉगिंग किंवा युट्युब चॅनेल

या कौशल्यांच्या आधारे फ्रीलान्सिंग आणि घरून काम करण्याच्या संधी मिळू शकतात.

खाजगी अल्पकालीन कोर्सेस

खाजगी संस्थांमध्ये अनेक शॉर्ट टर्म कोर्सेस उपलब्ध आहेत:

हॉटेल व्यवस्थापन व हस्पिटॅलिटी

हाउसकीपिंग

सुरक्षा रक्षक प्रशिक्षण

रिटेल सेल्स आणि ग्राहक सेवा

कुरिअर आणि लॉजिस्टिक मॅनेजमेंट

हे कोर्स लगेच नोकरी मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतात.

ओपन स्कूलद्वारे परत शिक्षण पूर्ण करणे

ज्यांना शिक्षण पुन्हा सुरू करायचं आहे, त्यांच्यासाठी National Institute of Open Schooling (NIOS) किंवा राज्यातील ओपन स्कूल्स चांगला पर्याय आहेत. यामुळे काम करता करता शिक्षण घेता येते.

शेवटी महत्त्वाचं काय?

दहावी नापास होणं म्हणजे अपयश नाही, तर एक नवीन वाट निवडण्याची संधी आहे. कौशल्यावर आधारित करिअर, स्वयंपूर्ण व्यवसाय किंवा लघु प्रशिक्षण कोर्सेसच्या मदतीने अनेक विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. पालकांनीही मुलांना मानसिक आधार देणे, त्यांच्यावर विश्वास ठेवणे आणि त्यांच्या कौशल्यांना दिशा देणे गरजेचे आहे. दहावी नापास विद्यार्थीही योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीने यशस्वी भविष्य घडवू शकतात.