पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार, 12 मे दिवशी पंजाबच्या आदमपूर हवाई तळाला अचानक भेट देऊन 22 एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिकांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या भारतीय हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सैन्यदलातील जवानांना सलाम केला. या भेटीतील एक फोटो व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या मागे रशियन बनावटीच्या S-400 air defence system प्रमुखपणे दिसत आहेत. पंतप्रधानांनी हवाई दल तळाला भेट देताना काही फोटो देखील शेअर केले आहेत. हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीचा हा सार्वजनिकरित्या प्रसिद्ध झालेला पहिला फोटो असू शकतो. या फोटोला विशेष महत्त्व आहे कारण ते पाकिस्तानच्या पूर्वीच्या दाव्याच्या थेट विरोधात आहे. त्यांच्या जेएफ-१७ लढाऊ विमानाने अलिकडच्या चार दिवसांच्या लष्करी संघर्षादरम्यान एस-४०० प्रणाली नष्ट केल्याचं म्हटलं होतं.
Prime Minister Narendra Modi's @narendramodi interaction with air warriors and soldiers at AFS Adampur#OperationSindoor
Watch Live Streaming - https://t.co/uGsPPq2fgY
— LatestLY (@latestly) May 13, 2025
Sharing some more glimpses from my visit to AFS Adampur. pic.twitter.com/G9NmoAZvTR
— Narendra Modi (@narendramodi) May 13, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)