Fire In Pune: पुणे कॅन्टोन्मेंट मधील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाचा आयसीयू प्रभाग आग
Fire (Representational image) Photo Credits: Flickr)

Fire In Pune: पुणे शहरातील कॅन्टोन्मेंटमधील सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel Hospital) रुग्णालयाच्या आयसीयू प्रभागात (ICU Ward) आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताचं अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचं काम सुरू आहे.

अद्याप आगीचं कारण स्पष्ट झालेलं नाही. सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या आयसीयू प्रभागात आग झागल्याने तेथील रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. हेही वाचा -Coronavirus Pandemic: महाराष्ट्रात मुंबई पाठोपाठ 'या' जिल्ह्यात आहेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण; जाणून घ्या जिल्हानिहाय आकडेवारी) (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...)

गेल्या महिन्यात गुजरातच्या अहमदाबादमधील खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आग लागल्याच्या भीषण घटनेत आठ कोरोनाग्रस्त रूग्णांचा मृत्यू झाला होता.