Coronavirus Pandemic: महाराष्ट्रात मुंबई पाठोपाठ 'या' जिल्ह्यात आहेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण; जाणून घ्या जिल्हानिहाय आकडेवारी
Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) फैलाव दिवसेंदिवस वाढत असून तो आटोक्यात आणण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. राज्यात काल (4 सप्टेंबर) दिवसभरात कोरोनाचे आणखी 19,218 रुग्ण आढळून आले असून 387 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) एकूण कोरोना संक्रमितांचा (COVID-19 Positive) आकडा 8,63,062 वर पोहचला आहे. राज्यात आतापर्यंत 6,25,773 जणांची प्रकृती सुधारली असून 2,10,978 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्याचसोबत आतापर्यंत 25,964 जणांनी कोरोना व्हायरसमुळे आपली जीव गमावला आहे. असे असले तरी दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे दिवसागणिक कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे रिकव्हरी रेट देखील सुधारला आहे.

राज्यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत (Mumbai) असून त्यापाठोपाठ पुण्यात (Pune) सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. मुंबईत एकूण संक्रमितांची संख्या 1,52,024 वर पोहोचली आहे. काल मुंबईमध्ये 1,110 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण 1,21,671 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्येमध्ये वाढ होत असल्याने, सध्या मुंबईमध्ये 22,220 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल शहरामध्ये कोरोनाच्या 35 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 7,796 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बीएमसीने (BMC) याबाबत माहिती दिली. Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1,929 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,52,024 वर

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी (4 सप्टेंबर रात्री 8: 00 वाजेपर्यंत)

जिल्हा उपचार सुरू मृत्यू बरे झालेले रुग्ण संक्रमित रुग्ण
अहमदनगर 4945 331 17946 23222
अकोला 884 161 3157 4203
अमरावती 1228 140 4294 5662
औरंगाबाद 5238 683 18284 24205
बीड 1302 137 3784 5223
भंडारा 600 23 747 1370
बुलढाणा 1211 82 2602 3895
चंद्रपूर 1800 19 1439 3258
धुळे 2424 224 6348 8998
गडचिरोली 253 1 650 904
गोंदिया 919 22 1044 1985
हिंगोली 305 41 1293 1639
जळगाव 8047 908 21272 30227
जालना 1465 144 3201 4810
कोल्हापूर 6224 752 17525 24501
लातूर 3282 297 5681 9260
मुंबई 22222 7799 121671 152024
नागपूर 15440 847 18210 34501
नांदेड 4219 235 4079 8533
नंदुरबार 1201 82 1782 3065
नाशिक 9529 937 32825 43291
उस्मानाबाद 2240 192 4427 6859
इतर राज्ये 743 78 0 821
पालघर 5583 628 20955 27166
परभणी 1402 93 1564 3059
पुणे 55023 4333 130366 189722
रायगड 6531 816 25742 33091
रत्नागिरी 1913 160 2573 4646
सांगली 7069 508 9184 16761
सातारा 6486 400 9889 16777
सिंधुदुर्ग 817 24 719 1560
सोलापूर 5552 818 15089 21460
ठाणे 22312 3913 112952 139178
वर्धा 672 18 626 1317
वाशिम 494 33 1475 2003
यवतमाळ 1403 85 2378 3866
एकूण 210978 25964 625773 863062

कोरोनाची परिस्थिती अधिक भयंकर होऊ नये म्हणून वेळोवेळी सरकारकडून उपययोजना केल्या जात आहे. तसेच कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी सुद्धा लॉकडाऊनचे आदेश दिले गेले जात आहेत. परंतु राज्यात सध्या अनलॉक-4 नुसार काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामध्ये ई-पास आवश्यक नसणार असून नागरिकांना प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु अद्याप सरकारने मंदिरे, जिम, धार्मिक स्थळ आणि मेट्रो सेवा बंद ठेवली आहे.