Reliance Communications chief Anil Ambani. (Photo Credit: File)

येस बॅंक मध्ये रिलायंस ग्रुपचे चेअरमॅन अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. सध्या आर्थिक अडचणींमध्ये अडकलेल्या येस बॅंकेचे (YES Bank) प्रमोटर राणा कपूर (Rana Kapoor) यांच्या विरूद्ध मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये ईडी ने अनिल अंबानी यांना समन्स बजावला आहे. प्राप्त माहितीनुसार अनिल अंबानी यांना (16 मार्च ) ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश आहेत. मात्र प्रकृती अवस्थ्याचं कारण देत ही हजेरी टाळली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान अनिल अंबानी यांच्या ग्रुपने येस बॅंकेकडून कर्ज घेतल्याची माहिती आहे. येस बॅंकेतून सर्वाधिक लोन घेतलेल्यांच्या यादीमध्ये त्यांचा समावेश आहे. अंबानी यांनी कर्ज घेऊन त्याची परतफेड केली नसल्याचं सांगण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलेल्या माहितीमध्ये येस बॅंकेकडून अंबानी यांनी 12 हजार 800 कोटी रूपयांचं कर्ज घेतलं होतं. दरम्यान अंबानीसोबतच इस्सेल, आयएलएफएस, डीएचएफएल आणि व्होडाफोन या कंपन्यांनादेखील येस बॅंकेने कर्ज दिले होते.

ANI Tweet

पीएमएलए नुसार, अनिल अंबानी यांचा या प्रकरणातील त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने राणा कपूर यांची चौकशी करून त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या मुलींना रोखण्यात आले होते. आता येस बॅंकेच्या पुनर्रचना करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. आरबीआयने येस बॅंकेच्या ग्राहकांना पैसे काढण्यावर निर्बंध घातले आहेत.