Deepak Kesarkar On Sanjay Raut | (Photo Credit: Archived, edited, representative images)

शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) द्वार अटक करण्यात आली. तत्पूर्वी त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आल. या वेळी केलेल्या कारवाईत राऊत यांच्याकडे 10 लाख रुपयांची रक्कम सापडली. या रकमेवर 'एकनाथ शिंदे- अयोध्या' (Eknath Shinde-Ayodhya) असे लिहिले होते. त्यामुळे या रकमेचे गौडबंगाल काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

दीपक केसरकर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, संजय राऊत हे प्रंचड हुशार आणि प्रामाणिक नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे मिळालेल्या रकमेचा ते सर्व तपशील नक्कीच ईडीला देतील. त्यांच्याकडे सापडलेल्या रकमेवर 'एकनाथ शिंदे- अयोध्या' असे लिहिलेले आढळले. कदाचित अयोध्येत जाऊन त्यांना शिंदे यांच्याविरोधात काही करायचे असेल, असे केसरकर म्हणाले. पण, खरे सांगायचे तर संजय राऊत हे बुद्धिमान आहेत. त्यामुळे ते मुद्दामच असे काही लिहिणार नाहीत. एकनाथ शिंदे यांच्याशी या रकमेचा काहीही संबंध नाही, असेही केसरकर म्हणाले. (हेही वाचा, Aaditya Thackeray Shiv Samvad Yatra: शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांची 'शिव संवाद' यात्रा, दुसरा टप्पा आजपासून सुरु; जाणून घ्या वेळापत्रक)

संजय राऊत यांनी या आधिही गुवाहाटीला गेलेल्या आम्हा आमदारांवर पैसे दिल्याचा आरोप मोठ्या प्रमाणावर केला होता. यावर आम्ही त्यांना अवाहनच दिले होते की, आमची घरे तपासून पाहा. आमच्याकडे कोणत्याच स्वरुपाचे असे पैसे सापडणार नाहीत. कारण आम्ही केलेला उठाव हा नक्कीच पैशांसाठी नव्हता, असेही केसरकर म्हणाले.

संजय राऊत यांच्या भांडुप येथील ‘मैत्री’ बंगल्यावर ईडीच्या साधारण 10 अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या वेळी महाराष्ट्र पोलीस आणि केंद्रीय पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर होता. या वेळी संजय राऊत यांचे घर आणि संबंधित ठिकाणीही शोधमोहीम राबविण्यात आली. या वेळी. त्यांच्या घरी 10 लाख रुपयांची रक्कम सापडल्याची माहिती आहे.