शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) जोरदार सक्रीय झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसोबत केलेल्या बंडानंतर ही सक्रीयता वाढली आहे. या संक्रियतेचाच भाग म्हणून आदित्य ठाकरे यांनी 'शिवसंवाद यात्रा' (Shiv Samvad Yatra) सुरु केली आहे. या यात्रेचा दुसरा टप्पा (1 ऑगस्ट) आजपासून सुरु होत आहे. 'शिवसंवाद यात्रे'चा (Aaditya Thackeray Shiv Samvad Yatra) दुसरा टप्पा आदित्य ठाकरे कोकणातून सुरु करत आहे. या यात्रेचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. पहिल्या टप्प्याप्रमाणेच शिवसैनिक आणि जनता मोठ्या प्रमाणावर पाठींबा दर्शवतील असे शिवसेना नेत्यांकडून सांगितले जात आहे.
शिवसंवाद यात्रा- दुसरा टप्पा- वेळापत्रक
1 ऑगस्ट
- -शिवसंवाद यात्रा, दुसरा टप्पा, दिवस पहिला-
- -सकाळी 11.30 वाजता कुडाळ येथे शिव संवाद यात्रा
- - दुपारी 12.30 वाजता सावंतवाडी येथे मेळावा
- - सायंकाळी 6.30 वाजता कोल्हापूर शहर येथे मेळावा
2 ऑगस्ट
- शिवसंवाद यात्रा, दुसरा टप्पा, दिवस दुसरा-
- कोल्हापूर येथून शिरोळकडे रवाना (सकाळी 10 वाजता)
- वाजता शिरोळ येथे शिव संवाद यात्रा (दुपारी 12)
- वाजता पाटण येथे शिव संवाद (दुपारी 3.15)
- कात्रज येथे शिव संवाद (सायंकाळी 6.45) (हेही वाचा, Sanjay Raut Case: संजय राऊत यांना कोर्टासमोर आज हजर करणार, ईडीकडून रात्री उशीरा अटक)
एकनाथ शिंदे आणि आमदारांनी बंड केल्यानंतर आदित्य ठाकरे पहिल्यांदाच कोकणात येत आहेत. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. त्यामुळे शिवसेना बंडखोर आणि संजय राऊत यांची अटक यावर आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरककर हे कोकणचे आहेत. त्यांनीही आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.