शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय आणि पक्षाची तोफ अशी ओळख असलेले खासदार संजय राऊत (Sanjay Raut Arrest) यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) मध्यरात्री उशीरा अटक केली. त्यांना आज (1 ऑगस्ट) सकाळी 11 वाजणेच्या दरम्यान कोर्टासमोर हजर केले जाण्याची शक्यता आहे. ईडीने राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी काल (31 ऑगस्ट) सकाळपासून छापेमारीची कारवाई केली. ही कारवाई रात्री उशीरपर्यंत सुरु होती. अकेर ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले. या वेळी त्यांच्या घरातून काही कागदपत्रांसह 11 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.
संजर राऊत यांना ताब्यत घेतल्यापासून संपूर्ण रात्र ईडी कार्यालयात घालवावी लागली. कोर्टात हजर करण्यापूर्वी आज सकाळी 9:30 वाजता जे जे हॉस्पिटलमध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. नंतर सकाळी 11:30 वाजता संजय राऊत यांना कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. (हेही वाचा, Patra Chawl Case: 'संजय राऊत यांना ना अटक करण्यात आली, नाही ताब्यात घेण्यात आले'; वकील Vikrant Sabne यांचा दावा)
संजय राऊत म्हणजे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय तसेच, पक्षाची बुलंद तोफ अशी ओळख असलेले नेते आहेत. संजय राऊत यांनी महाविकासआघाडी सरकारमध्ये शिवसेना असताना आणि नसतानाही पक्षाचा किल्ला जोरदार लढवला. खास करुन जेव्हा शिवसैनिकांचे प्रेरणा आणि श्रद्धास्थान असलेल्या मातोश्रीवर आरोप झाले तेव्हा संजय राऊत हे एकमेव असे नेते होते जे फ्रंटला येऊन बोलत होते. महत्त्वाचे असे की, भाजप अत्यंत टोकाची टीका करत असाना राऊत यांनी नेहमीच सडेतोड उत्तरे दिली आहेत. त्यामुळे राऊत यांची अटक झाल्यावर शिवसेनवेच्या वतीने खिंड कोण लढवणार याबाबत उत्सुकता आहे.
संजय राऊत यांना पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणी अटक झाली आहे. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, भाजप संजय राऊत यांना घाबरत आहे. म्हणूच त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेसंबंधी कोणतीही कागदपत्रे आम्हाला देण्यात आली नाहीत. त्यांना या प्रकरणात गोवण्यात आल्याचेही ते म्हणाले.आज सकाळी साडेआकरा वाजता त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाईल, अशी माहितीही सुनील राऊत यांनी दिली आहे.