ED Summons Hasan Mushrif: राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने नोटीस धाडली आहे. हसन मुश्रीफ यांना येत्या 24 तारखेला चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. इडीने या आधीही हसन मुश्रीफ यांची चौकशी केली आहे. या आधी ईडने केलेली मुश्रीफ यांची चौकशी 10 तास सुरु राहिली होती. ईडीने आतापर्यंत मुश्रीफ यांची दोन वेळा चौकशी केली आहे.
हसन मुश्रीफ यांना ईडीने या आधी 11 मार्च रोजी नोटीस पाठवली होती. मनी लॉन्ड्रींग आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणा ईडीने मुश्रीफ यांच्या कोल्हापूर येथील घरावर छापा टाकला होता. प्राप्त माहितीनुसार, ईडी आणि आयकर विभागाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुश्रीफ यांच्या कोल्हापूर येथील घरासोबतच त्यांच्याशी संबंधीत इतरही 11 जागांवर छापा टाकला आहे. ही कारवाई भल्या पहाटे करण्यात आली होती. (हेही वाचा, Hasan Mushrif: हसन मुश्रीफ यांना मुंबई हाय कोर्टाचा मोठा दिलासा, दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे ईडीला निर्देश)
माजी खासदार आणि विद्यमान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकासआघाडी सरकारमधील आणि घटक पक्षातील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केला आहेत. तसेच आरोप सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावरही केला आहे. सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर 158 कोटी रुपयांच्या अनियमिततेचा आरोप केला आहे.
दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी सोमय्या यांनी केलेल्या सर्व आरोपांचे खंडण करत ते फेटाळून लावले आहेत. या आधी किरीट सोमय्या यांनी मविआतील नेते अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत, अनिल परब यांच्यावर आरोप केले आहेत. आता त्यांनी मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.