Court Hammer | (Photo Credit: Archived, edited, representative images)

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) जेट एअरवेजचे (Jet Airways) माजी अध्यक्ष नरेश गोयल (Naresh Goyal) आणि त्यांची पत्नी अनिता (Anita) यांच्याविरुद्ध दाखल केलेला खटला मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) रद्द केला आहे. गोयल दाम्पत्यावर ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यान्वये (Prevention of Money Laundering Act) गुन्हा दाखल केला होता. ईडीचे मनी-लाँडरिंग प्रकरण एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरवर आधारित आहे, ज्यामुळे मुंबईस्थित ट्रॅव्हल कंपनीची 46 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. अकबर ट्रॅव्हल्स ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य वित्त अधिकारी राजेंद्रन नेरुपारंबिल यांनी ही तक्रार केली आहे.

ईडीने (ED) दाखल केलेले हे प्रकरण मनी-लाँडरिंग प्रकरण एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरवर आधारित आहे. ज्यात म्हटले आहे की, मुंबईस्थित ट्रॅव्हल कंपनीची 46 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. अकबर ट्रॅव्हल्स ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य वित्त अधिकारी राजेंद्रन नेरुपारंबिल यांनी केलेल्या तक्रारीवर आधारीत असे हे प्रकरण आहे.

तक्रारीत म्हटल्यानुसार, ही कंपनी 1994 पासून जेट एअरवेजसोबत व्यवसाय करत होती. आरोपींनी त्यांच्या कंपनीतील आर्थिक आरीष्ठ लपवले आणि ट्रॅव्हल एजन्सीला त्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही असे आश्वासन दिले.आरोपींच्या आश्वासनावर ट्रॅव्हल एजन्सीने मँचेस्टर-मुंबई विमानाची तिकिटे स्वस्त दरात विकली. तथापि, जानेवारी 2019 मध्ये, काही जेट एअरवेजची उड्डाणे रद्द झाली, ज्यामुळे तक्रारदाराला आरोपींकडे जाण्यास भाग पाडले.

फिर्यादीने आरोप केला आहे की, आरोपी त्यांना त्यांच्या आर्थिक मदतीचे आश्वासन देत राहिले. त्यांनी दावा केला की, हे पैसे थकबाकीची परतफेड करण्यासाठी भारतात पाठवले जातील आणि आश्वासनांमुळे त्यांचे नुकसान झाले. दरम्यान, ईडीने यापूर्वी दावा केला होता की गोयल यांच्या व्यवसायात 19 खाजगी कंपन्यांचा समावेश आहे ज्यापैकी 14 कंपन्या भारतात नोंदणीकृत आहेत आणि पाच बाहेर नोंदणीकृत आहेत.