Drugs Case: आर्यन खान याला नशामुक्ती केंद्रात पाठवावे, रामदास आठवले यांचा शाहरुखला सल्ला
Ramdas Athawale | (Photo Credits-Facebook)

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्य मंत्री रामदास आठवले यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना समर्थन दिले आहे. त्यावरुन आठवले यांनी असे म्हटले की, त्यांनी काही चुकीचे केलेले नाही. महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांचा आरोप हा निराधार आणि खोडकर आहे. राज्य सरकारने वानखेडे यांना कोणत्याही प्रकारची हानी आणि त्यांच्या जीवाला धोका संभवणार नाही हे सुनिश्चित करावे. त्याचसोबत त्यांनी अभिनेता शाहरुख खान याला आर्यनवरुन सल्ला सुद्धा दिला आहे. आर्यन वरुन आठवले यांनी म्हटले की, आर्यन खान याला नशामुक्ती केंद्रात शाहरुख याने पाठवावे.(Aryan Khan Drugs Case: समीर वानखेडे यांचे मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र; केली 'ही' विनंती)

रामदास आठवले यांनी पुढे असे म्हटले की, आयपीआय पक्ष समीर वानखेडे यांच्या सोबत उभी राहिल. तसेच वानखेडे यांच्यावर लावण्यात आलेले आरोपांमध्ये सुद्धा काही तथ्य नाही आहे. माझे शाहरुख याला निवेदन आहे की, आर्यन खान याला सुधरवावे. मी सल्ला देतो की, त्याला एक-दोन महिन्यासाठी नशामुक्ती केंद्रात पाठवावे. जेणेकरुन तो ड्रग्ज पासून मुक्त होईल.(Drugs Case: एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी उशिरा पोहचलेल्या Ananya Panday हिला समीर वानखेडे यांनी फटकारले)

तर एनसीपी नेते नवाब मलिक हे या प्रकरणाला धार्मिक आणि जातिवादाचा रंग देऊ पाहत आहेत. त्यांनी दावा केला की, एनसीबीकडे आर्यन खान याच्या विरोधात पुरेसे साक्षीदार आहेत. त्यामुळेच त्याला जामिन दिला जात नाही आहे. आठवले यांनी पुढे असे म्हटले की, मी आणि एनसीबी तरुणांना नशेच्या सवयीपासून दूर ठेवण्यासाठी काम करत आहोत. त्याचसोबत एनसीबीने नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या विरोधात ड्रग्ज प्रकरणी कारवाई केली असल्याने ते वानखेडे यांना निशाणा बनवत आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी असे म्हटले की, समीर वानखेडे मुंबई एनसीबीचे कार्यक्षम आणि प्रामाणिक अधिकारी आहेत. महाराष्ट्राला गर्व वाटेल अशी गोष्ट आहे. मुंबईतील एका सामान्य घरात जन्मलेल्या अशा अधिकाऱ्याला ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक हे तुरुंगात पाठवण्याबद्दल बोलत आहेत. हे आव्हान स्विकारतो आणि नवाब मलिक यांच्या चुकीच्या गोष्टी सुद्धा समोर घेऊन येतो असे मलिक यांनी म्हटले आहे.