Drugs Case: मुंबई क्रुज ड्रग्ज प्रकरणी NCB कडून अधिकाधिक तपास केला जात आहे. तर बॉलिवूड स्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच प्रकरणी तुरुंगात आहे. पण आता ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) सुद्धा एनसीबीच्या रडावर आली आहे. शुक्रवारी अन्यना पांडे हिला दुसऱ्या वेळेस चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. तेव्हा ती एनसीबीच्या कार्यालयात तीन तास उशिरा आली. तिचे हे उशिरा येणे एनसीबीला अजिबात आवडलेले नाही. त्यामुळे तिला फटकारण्यात आले आहे.
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी अन्यना हिला उशिरा आल्याने फटकारले आहे. त्यांनी असे म्हटले की, तुला 11 वाजता चौकशीसाठी बोलावले होते पण उशिर झाला. तुमची वाट पाहत अधिकारी बसणार नाहीत. हे तुमचे प्रोडक्शन हाउस नाही आहे. हे सेंट्रल एजेंसीचे ऑफिस आहे. जेव्हा बोलावले त्याच वेळेत यावे. तर अनन्या हिला 11 वाजता चौकशीसाठी बोलावले होते पण ती दुपारी 2 वाजता एनसीबी कार्यालयात दाखल झाली.(Shah Rukh Khan च्या घरी Search Operation झाले नसून प्रक्रियेची गरज पूर्ण करण्यासाठी दाखल झालेली NCB टीम; NCB DDG Ashok Mutha Jain यांची माहिती)
दरम्यान, अनन्या पांडे हिची शुक्रवारी 4 तास चौकशी करण्यात आलीय गुरुवारी सुद्धा तिची 2 तास एनसीबीने चौकशी केली होती. आता येत्या सोमवारी सुद्धा अनन्या हिला पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले आहे. आतापर्यंत एनसीबी कार्यालयात अनन्या हिच्यासोबत चंकी पांडे सुद्धा पोहचले होते. रिपोर्ट्सनुसार, ज्या प्रकारे अनन्या हिची एनसीबीकडून चौकशी केली जात आहे त्यामुळे आर्यन याच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे.
अनन्या पांडे संबंधित तीन चॅट्स अत्यंत महत्वाचे आहेत. त्यानुसार 2018-2019 मध्ये हे चॅट्स गांजा संदर्भात झाले होते. अनन्या हिचे दोन्ही फोन एनसीबीने जप्त केले आहेत. त्यावरुन सुद्धा अनन्या हिला विविध प्रश्न विचारले गेले. पण तिने त्याबद्दल तिला अधिक माहिती नसल्याचे सांगत उत्तर देण्यास टाळाटाळ केली.