धक्कादायक! ठाणे येथे एका वेगवान कारच्या धडकेत 40 वर्षीय महिला जखमी; संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

ठाणे येथे वेगवान कारच्या धडकेत एका 40 वर्षीय महिला जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना ठाणे (Thane) जिल्ह्यातील सिद्धचल (Siddhachal) परिसरात गुरुवारी सायंकाळी घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या व्हिडिओत एक अज्ञात वेगवान कार रस्त्यावर चालत असलेल्या एका महिला धडक देऊन तिला फरफटत नेल्याचे दिसत आहे. त्यांनतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेने संपूर्ण ठाणे परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीना शामिल नाडूमाकेरी असे या घटनेत जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. मीना या गुरुवारी सांयकाळी पोखरण रस्त्यावरून जात असताना एका भरघाव वेगाने येणाऱ्या एका कारने त्यांना जोरदार धडक देत त्यांना फरफटत नेले आहे. दरम्यान, घटनास्थळी असलेल्या स्थानिकांना जवळच्या रुग्णालयात दाखल घेऊन गेले आहे. सुदैवाने, या घटनेत मीना यांना किरकोळ जखम झाल्या आहेत. हे देखील वाचा- उत्तर प्रदेश: सीतापूर येथील मौसम देवी हिने दिला 4 बाळांना जन्म; घरासमोर बघ्यांची गर्दी

ट्वीट-

सध्या स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत आहेत. महत्वाचे म्हणजे, या व्हिडिओ भरघाव वेगात येणाऱ्या चारचाकी वाहनाची एका दुचाकी आणि युटर्न घेणाऱ्या दुसऱ्या चारचाकी वाहनाला धडक होणारी होती. परंतु, काही सेकंदात हा मोठा अनर्थ टळला आहे.