आपण एखाद्या महिलेने जुळ्या बाळांना जन्म दिल्याचे ऐकले असेल. अपवादत्मक स्थितीत तिळे जन्माला आल्याचेही आपण ऐकले असेल. पण, उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) एका महिलेने चक्क चार बाळांना जन्म दिला आहे. वाटले ना आश्चर्य. पण होय, ही घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमधील सीतापूर (Sitapur) जिल्ह्यातील रेउसा ब्लॉक येथील भदमरा गावात मौसम देवी (Mausam Devi) नामक महिलेने शुक्रवारी (14 ऑगस्ट) चक्क 4 बाळांना जन्म दिला.
प्राप्त माहिती अशी की, बाळ आणि बाळंतीन असे चौघांचीही प्रकृती आता ठिक आहे. बाळंत महिलेला जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रेउसा सीएचसी अधीकक्ष डॉ. अनंत मिश्रा यांनी आयएनएसशी बोलताना सांगितले की, 'मौसम देवी असे महिलेचे नाव आहे. या महिलेने चार बाळांना जन्म दिला. सदर महिला सीतापूर जिल्ह्यातील भदमरा गावीच रहिवासी आहे. प्रसुतीनंत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.'
पुढे बोलताना अधीकक्ष डॉ. अनंत मिश्रा यांनी सांगितले की चारही बाळांचे वजन साधारण एक किलो किंवा त्याच्या आसपास आहे. बाळं आणि बाळंतीन यांची प्रकृती ठिक आहे. पण, पुढे जाऊन काही आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नयेत. यासाठी चौघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मौसम देवी हिने तीन मुली आणि एका मुलाला जन्म दिला आहे. (हेही वाचा, भोपाळ: 22 वर्षीय महिलेने दिला 6 बाळांना जन्म)
मौसमी देवी हिचे पती आणि त्या चार नवजात बाळांचे वडील मुन्नू लाल यांनी सांगितले की, पत्नीने तीन मुली आणि एका मुलाला जन्म दिला आहे. सध्या पाचही जण सुखरुप आहेत. मात्र, बाळांना पाहण्यासाठी गावातील लोक घरी गर्दी करु लागले आहेत. आता पत्नी आणि मुलांना रुग्णालयात दाखल केले आहे.