भोपाळ: 22 वर्षीय महिलेने दिला 6 बाळांना जन्म; 2 मुलींचा जन्मतःच मृत्यू
Image For Representation (Photo Credits: ANI)

भोपाळ (Bhopal) मध्ये श्योपुर (Shyopur) जिल्ह्यात अवघ्या 22  वर्षीय महिलेने एकाच वेळी लागोपाठ 6 बाळांना जन्म दिल्याची आश्चर्यकारक घटना समोर येत आहे. शनिवारी या महिलेने केवळ अर्ध्याच तासात 6 बाळांना जन्म दिला होता ज्यामध्ये चार मुले आणि दोन मुलींचा समावेश होता, दुर्दैवाने या दोन मुलींचा जन्मतःच मृत्यू झाल्याचे समजतेय. या दोन मुलींचे वजन अवघे 390 ग्रॅम व 450 ग्रॅम होते. तर, मुलांचे वजन 615 ग्राम आणि 790 ग्राम इतके होते. या मुलांना सध्या दक्षता विभागात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. अबब! ३८ मुलांची आई आहे ३९ वर्षांची महिला, १३ व्या वर्षी दिला होता पहिल्या बाळाला जन्म

प्राप्त माहितीनुसार, संबंधित जन्मदाती महिला ही शनिवारी सकाळी रेग्युलर तपासणीसाठी आली होती, यावेळी सोनोग्राफी नंतर तिच्या गर्भात सहा बाळं असल्याचे समजले होते, प्रसूतीच्या वेळी सुद्धा महिलेने नॉर्मल पद्धतीने मुलांना जन्म दिला.यापूर्वी सुद्धा, इराक मधील एका महिलेने तब्बल 7 मुलांना नॉर्मल डिलिव्हरीने जन्म दिल्याचे घटना घडली होता. या डिलिव्हरीनंतर ही महिला आणि तिची सर्व मुले दोघेही सुखरूप होती. या महिलेचे वय 25 वर्षे असून, तिने 6 मुली आणि एक मुलाला जन्म दिला होता.

दरम्यान, पोटात एका पेक्षा जास्त भ्रूण असले की जास्त मुले होण्याचे चान्सेस वाढतात. मात्र अशावेळी सर्वच्या सर्व मुले आरोग्यदायी असण्याची शक्यता कमी असते, म्हणून अशावेळी मुद्दाम भ्रूणांची संख्या कमी केली जाते.