राज्यात उकाडा वाढत असला तरी हवामानात कधीही बदल होतो ज्यामुळे कधी मेघगर्जनेसह धो-धो पाऊस देखील पडतो. अशावेळी शेतात करणा-या शेतक-यांना कधी कधी काय करावे ते सुचत नाही. अशावेळी कोणती खबरदारी घ्यावी हेच ब-याचदा अनेकांच्या लक्षात येत नाही. शेतात असताना मेघगर्जना (Tips for Farmers) होत असल्यास काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी खास प्रादेशिक हवामान व विज्ञान केंद्राने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
शेतात असताना वीज चमकल्यास काय करावे?
- फळबागा आणि भाजीपाल्यामध्ये आधार व यांत्रिक साहाय्य द्यावे.
- प्राण्यांना खुले पाणी, तलाव आणि नदीपासून दूर ठेवावे
- शेतातील उभ्या पिकांमधील नको असलेले पाणी काढून टाका
- जर शेतकरी शेतात असतील तर आणि त्यांना निवारा मिळाला नसेल तर उंच वस्तू टाळा. जवळपास तुरळक झाडं असल्यास त्याखाली जाऊन बसावे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) March 16, 2021
शेतात असताना वीज चमकल्यास काय करु नये?
- विद्युत उपकरणे, वायर वा केबलचा वापर टाळा
- ट्रॅकर, शेतीची उपकरणे, दुचाकीपासून दूर राहा.
- आपल्या प्राण्यांना झाडाखाली जमू देऊ नका. त्यांच्यावर लक्ष ठेवा.
हवामानाचा ऊन-पावसाचा खेळ हा सुरुच असतो. मात्र आपण योग्य ती खबरदारी घेतल्यास कोणतीही अडचण येणार नाही हे लक्षात ठेवा. शेतक-यांनी वीज चमकत असताना स्वत:ची तसेच आपल्या प्राण्याची काळजी घेणे गरजेचे आहे. साधारणपणे जूनच्या पहिल्या वा शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरुवात होते. त्यानंतर हळूहळू राज्यात धो-धो पाऊस पडायला सुरुवात होईल. अशा वेळी शेतक-यांनी शेतात काम करताना वर दिलेल्या गोष्टी ध्यानात ठेवल्यास त्यांना सहसा अडचण येणार नाही.