राज्यातील विविध पालिकांनी त्यांच्या क्षेत्रात लॉकडाऊन केले आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांचा सहभाग मिळवून कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करा. शहरी भागातील कोरोना ग्रामीण भागात पसरू देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज सर्व जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्याशी व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, लॉकडाऊन लावून रोगाला अटकाव करण्याची खात्री असेल, तर विश्वासाने पण तारतम्याने निर्णय घ्या. कुणाच्याही दडपणाखाली येऊ नका. प्रशासनातल्या सर्व यंत्रणांनी घट्टपणे हातात हात घालून काम केले पाहिजे. सरकारच्या वेळोवेळी सुचना येतात. प्रत्येकाने आपल्या सोयीप्रमाणे अर्थ काढू नये. (हेही वाचा - Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांनी ओलांडला 3 लाखांचा टप्पा; आज 8,348 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर 144 जणांचा मृत्यू)
राज्यातील #COVID_19 उपाययोजनांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाधिकारी, आयुक्तांकडून दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला आढावा. आरोग्यमंत्री @rajeshtope11 सहभागी. #Lockdown चा उपयोग परिस्थिती सुधारण्यासाठी व्हावा, शहरी भागातील #कोरोना ग्रामीण भागात पसरू देऊ नका- मुख्यमंत्री pic.twitter.com/o6xjHIPazq
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 18, 2020
सरकारने राज्यात प्रयोगशाळांची संख्या 130 पर्यंत वाढविली आहे. धार्मिक, समाजिक, राजकीय कार्यक्रमांना बंदी कायम ठेवली आहेत. सणवार साजरे करतांना नवे कंटेनमेंट क्षेत्र वाढू नये. काही दिवसांपूर्वी धारावीच्या मॉडेलचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले. मुंबईने अत्यंत पारदर्शक पद्धतीने काम केले आहे. कुठलीही माहिती लपविली नाही. हे संकट किती भीषण आहे आणि त्याचा मुकाबला राज्य सरकारने कसा केला. हे देखील आपण नागरिकांना विश्वासात घेऊन मोकळेपणाने सांगितले आहे. धारावीसारखा परिणाम आपल्याला राज्यात इतरत्रही दाखवता येऊ शकेल, असा विश्वासदेखील यावेळी ठाकरे यांनी व्यक्त केला.
यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी सांगितले की, 80 टक्के बेड्स राखीव ठेवले आहेत. त्याची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी. महात्मा फुले जनआरोग्य योजनेची अंमलबजावणी व्हावी. रुग्ण वाढीचा वेग लक्षात घेता ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, जळगाव अशा शहरांमध्ये अधिकाधिक ऑक्सिजन बेड्स व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी प्रदीप व्यास यांनी यावेळी केली.