Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांनी ओलांडला 3 लाखांचा टप्पा; आज 8,348 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर 144 जणांचा मृत्यू
Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रातील (Maharashtra) कोरोनाग्रस्तांनी आज 3 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आज राज्यात 8 हजार 348 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आज दिवसभरात 144 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय आज राज्यातील 5 हजार 307 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.

आतापर्यंत राज्यातील 1 लाख 65 हजार 663 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच दुर्देवाने आतापर्यंत 11 हजार 596 जणांची कोरोना विरुद्धची लढाई अयशस्वी झाली आहे. सध्या राज्यात 3,00,937 रुग्ण कोरोनाग्रस्त आहेत. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने (State Health Department) माहिती दिली आहे. (हेही वाचा - वसई-विरार मध्ये आज COVID19 च्या 292 रुग्णांची नोंद तर 5 जणांचा बळी, शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा 9,576 वर पोहचला)

दरम्यान, भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची आकडेवारी झपाट्याने वाढत आहे. आज आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील 24 तासांत 34 हजार 884 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तसेच 671 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 10,38,716 इतकी झाली आहे. तसेच आतापर्यंत 26 हजार 273 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.