Coronavirus Cases (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि पुणे कोरोनाचे मुख्य हॉटस्पॉट ठरले आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोरोनाच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत असून प्रादुर्भाव परसण्याबाबत सर्वोतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे. याच दरम्यान आता वसई-विरार मध्ये आज कोरोनाच्या आणखी 292 रुग्णांची भर पडली असून 5 जणांचा बळी गेल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. तर वसई-विरार मधील आता कोरोनाबाधितांचा आकडा 9,576 वर पोहचला आहे.(महाराष्ट्रात आतापर्यंत 642 कैदी व तुरुंगातील 206 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, पहा आकडेवारी)

वसई विरार येथे सध्या कोरोनाचे 3047 अॅक्टिव्ह रुग्ण असून 189 जणांचा बळी गेला आहे. वसई-विरार नंतर पालघर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 323 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 11,403 वर पोहचला आहे.(Coronavirus: पुण्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची मदत)

दरम्यान, कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात येत आहेत. तसेच नागरिकांना सुद्धा स्वत:सह परिवाराची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. तर कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तर काही दिवसांपूर्वी महापालिकेने पीएम केअर्स फंडच्या माध्यमातून केंद्राकडून राज्याला 446 व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती दिली होती. हे सर्व व्हेंटिलेटर्स एकत्रितपणे नव्हे तर टप्प्याटप्प्याने देण्यात आलेले आहेत. केंद्राकडून देण्यात आलेले हे व्हेंटिलेटर्स विविध कोविडच्या रुग्णालयात पुरवले जात असल्याचे ही महापालिकेने स्पष्ट केले आहे.