धुळे जिल्ह्यातील (Dhule) शिंदखेड्यात एक धक्कादायक घटना घडली असून यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. धुळे जिल्ह्यात तापी नदीवर गेलेल्या वडील व दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. तापी नदीच्या (Tapi River) काठी गेल्यानंतर पाण्यात उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज त्यांना न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी त्यांचे मृतदेह तरंगताना आढळून आले. (हेही वाचा - Car Accident: कारच्या जोरधार धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू, कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरभीषण अपघातात 11 जण गंभीर)
मध्य प्रदेश सेंधवा येथील मूळचे रहिवाशी असलेले धुळ्याती शिंदखेड्यातील नेवाडे याठिकाणी मजुरीसाठी आले होते. हे आदिवासी कुटुंब चार- पाच वर्षांपासून येथेच वास्तव्यास होते. दरम्यान शेतातील झोपडीतून नदीकाठी हरसिंग भीमसिंग देवरे (वय 35), त्यांचा मुलगा आकाश (वय 8) व मुलगी नवसी (वय 10, सर्व रा. झोपाली, ता. सेंधवा, जि. बडवानी, मध्य प्रदेश) नदीकाठी गेले असता त्यांचा बुडून मृत्यू झाला.
ते तिघे नेवाडे येथील तापी नदीकाठावर मिळून आले. त्यांना शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ. कुंदन वाघ यांनी त्याना मृत घोषित केले. शिंदखेडा पोलिसांत अकस्मात मृत्यू्ची नोंद झाली. तिघे तापी नदीपात्राच्या किनाऱ्याला बेशुद्धावस्थेत मिळून आले.