Car Accident: कारच्या जोरधार धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू, कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरभीषण अपघातात 11 जण गंभीर
Accident (PC - File Photo)

Car Accident: कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर आंबेवाडी परिसरातील रेडेडोहजवळ भरधाव मोटारीने रिक्षा आणि दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. काल संध्याकाळी हा अपघात घडून आला. या भीषण अपघातात 20 वर्षाच्या तरुणाच जीव गेला. तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. चारही वाहनांचा अपघात झाल्याने यातील 11 जण गंभीर जखमी झाले आहेत.  भीषण अपघातामुळे रस्त्यावरील वाहतुक सेवा काही काळ ठप्प झाली होती.

पंकज भाऊराय जाधव असे या अपघातात मृत्यू झाल्याचे तरुणाचे नाव आहे. पोलीसांना या घटनेची माहिती देताच घटनास्थळी धाव घेतला.या घटनेचा पंचनामा जवळच्या पोलीस ठाण्यात करण्यात आला. बाईकवर पंकज जाधव रस्त्यावरून जात असताना मोटारीची धडक रिक्षा आणि बाईकला लागली. धडक इतकी जोरदार होती की, त्यात पंकजचा मृत्यू झाला.मोटारीचा नियत्रंण सुटल्याने हा अपघात झाला.  अपघातात ११ जण जखमी झाले आहे. काहीना गंभीर जखमा झाल्याची माहिती मिळाली आहे.

 

जखमी झालेल्या लोकांना पोलीसांनी आणि स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. त्याना रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.  अपघातात मोटारीमधील सुंदर, शांता सुंदर बिदगर , मुलगा गीतेश  आणि कमलाबाई बिदगर जखमी झाले. रिक्षाचालक मुस्ताक अजीज शेख यांच्यासह रिक्षातील रुचिरा अभिजित आंबोजकर , अभिजित आंबोजकर , आघना अभिजित आंबोजकर जखमी झाले.