Devendra Fadanvis On BJP Win: 'महाराष्ट्रातही भाजपच येणार', चार राज्यांच्या निकालांनंतर देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
Devendra Fadnavis | (Photo Credit - Twitter/ANI)

देशात मध्य प्रदेश, (Madhya Pradesh) राजस्थान, (Rajasthan) छत्तीसगड (Chattisgad) आणि तेलंगणा (Telangana) विधानसभा निवडणुकीचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. या चार राज्यातील निवडणूकांमध्ये भाजपने 3 जागेवर जोरदार मुसंडी मारली आहे. तर तेलंगणा वगळता काँग्रेस पक्ष हा मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यात पिछाडीवर आहेत. निकालांनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी प्रतिक्रिया दिली. या विजयाचं श्रेय हे पंतप्रधान मोदी (Narendra Modi), अमित शाह (Amit Shah) आणि जे.पी नड्डा (J.P. Nadda) यांचं आहे. मोदींवरील विश्वासाचं हे यश असल्याचं यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.   (हेही वाचा - Chandrashekhar Bawankule: राज्यात भाजपाचे 200 आमदार निवडून येतील'; 4 राज्यांच्या निवडणूक निकालानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा दावा)

यावेळी महाराष्ट्रात देखील भाजपचं सरकार येणार असल्याचा विश्वास देखील देवेंद्र फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला. जनता ही मोदीजींच्याच पाठीशी आहे मला हे देखील नमूद केलं पाहिजे.  हीच परिस्थिती महाराष्ट्रात देखील आहे महाराष्ट्रामध्ये नुकत्याच ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं दोन तृतीयांश ग्रामपंचायत आणि लोकसभेमध्ये देखील तेच आपल्याला पाहायला मिळालं, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की "सर्व राज्यांमधल्या जनतेचे तर आभार मानतोच पण खऱ्या अर्थाने या विजयाचे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा आहे, मोदीजींच्या नावाचं, त्यांच्या करिष्म्याचं आहे. त्यासोबत आमचे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी आणि आमचे मास्टर स्ट्रॅटेजिस्ट अमित शाह यांच्यासोबत त्या त्या राज्यातली जी काही भाजपची टीम आहे आणि आमची राष्ट्रीय टीम आहे या सगळ्यांचं हे श्रेय आहे. म्हणून या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो."