Chandrashekhar Bawankule: राज्यात भाजपाचे 200 आमदार निवडून येतील'; 4 राज्यांच्या निवडणूक निकालानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा दावा
Chandrashekhar Bawankule. (Photo Credits: Twitter)

देशात मध्य प्रदेश, (Madhya Pradesh) राजस्थान, (Rajasthan) छत्तीसगड (Chattisgad) आणि तेलंगणा (Telangana) विधानसभा निवडणुकीचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. या चार राज्यातील निवडणूकांमध्ये  भाजपने 3 जागेवर  जोरदार मुसंडी मारली आहे. तर तेलंगणा वगळता काँग्रेस पक्ष हा मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यात पिछाडीवर आहेत. तीन राज्यात भाजपने मुसंडी मारल्यानंतर भाजप नेत्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे समोर येत आहे. राज्याच्या विधानसभा निकालावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी राज्यात देखील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत भाजप मोठे यश संपादन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  (हेही वाचा - PM Narendra Modi On BJP Win: भारतातील जनतेचा विश्वास फक्त सुशासन आणि विकासाच्या राजकारणावर, 3 राज्यातील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले मतदारांचे आधार)

नागपूरमध्ये असताना त्यांनी पत्रकारांनी सवांद साधला यावेळी त्यांनी भाजप पक्षाची राज्याची ताकद या विजयामुळे आणखी वाढेल असे म्हटले आहे. मोदींना हरविण्यासाठी तब्बल 28 पक्ष एकत्र आले आहेत. मात्र, जनता मोदींच्या पाठीशी आहे. त्यांचे हात बळकट करण्यासाठी आगामी लोकसभेत भाजपला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी चंद्रशेखर बावनकुले यांनी राज्यातील विधानसभेत भाजपचे 200 पेक्षा जास्त आमदार पुढच्या वेळी निवडूण येतील तसेच लोकसभेत 45 खासदार निवडूण येतील असा विश्वास व्यक्त केला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचंड पाठिंबा मिळत आहे. त्या पाठिंब्याच्या जोरावरच राज्यात महायुतीचे 48 पैकी 45 खासदार लोकसभेत निवडून येतील; असा विश्‍वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.