
देशात कोरोना विषाणूचे संकट असताना आता अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूची (Bird Flu) प्रकरणे समोर आली आहेत. या आजारामुळे हरियाना, पंजाब, मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ, हिमाचल प्रदेश अशा अनेक ठिकाणी हजारो पक्षांचा मृत्यू झाला आहे. आज महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बुधवारी महाराष्ट्रात ठाणे (Thane) शहरात कमीतकमी 15 पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत. मृत पक्ष्यांचे मृतदेह पुण्यातील रोग तपासणी एजन्सीकडे पाठविण्यात आले, या ठिकाणी पक्षांचा मृत्यू हा एच5 एन1 (H5N1) विषाणूमुळे झाला आहे का याची तपासणी केली जाईल.
ठाणे महानगरपालिका आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिल गार्डन, कोकणीपाडा आणि विजय गार्डन सोसायटी, कावेसर येथे पहाटे हे पक्षी मृतावस्थेत आढळले. मृत पक्ष्यांमध्ये 14 हर्न्स (लांब पायाचा बगळा) आणि कमीतकमी एक पॅराकीट (लांब शेपूट असलेला पोपट) यांचा समावेश आहे. एच 5 एन 1 विषाणूमुळे होणारा एव्हीयन इन्फ्लूएन्झा म्हणजेच बर्ड फ्लूने भारताच्या अनेक राज्यांमध्ये धुमाकूळ घातला आहे. केरळमध्ये या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी सुमारे 10,500 पक्ष्यांना दूर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
थंडीच्या महिन्यामध्ये सायबेरिया आणि मध्य आशियातून आलेल्या स्थलांतरित पक्षांद्वारे हे संक्रमण भारतामध्ये आले होते. याबाबत केंद्रीय सावधान व पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह म्हणाले की, सध्या सरकार सतर्क आहे आणि राज्यांना सर्वतोपरी मदत करीत आहे. मात्र मांस व अंडी सोडून देण्याची गरज नाही, संसर्गाचा कोणताही धोका टाळण्यासाठी त्यांना फक्त ‘पूर्णपणे शिजवण्याची’ गरज असल्याचे स्पष्टीकरणही मंत्र्यांनी दिले. (हेही वाचा: देशात Bird Flu चा धोका; 'या' राज्याने जाहीर केला State Disaster, अनेक राज्यांत अलर्ट जारी)
दरम्यान, 2006 मध्ये उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात बर्ड फ्लूची सर्वात साथ आली होती. त्यावेळी या आजाराने हजारो पक्ष्यांचा मृत्यू झाल्याने देशभर पोल्ट्री उद्योगाला याचा फटका बसला होता. त्यानंतर कित्येक आठवडे कोंबडी आणि अंडी यांचे दर पडलेलेच होते.