Dandpatta Significance: महाराष्ट्र सरकारने शिवजयंती उत्सवादरम्यान दांडपट्टा हे राज्य शस्त्र असल्याचे घोषीत (Maharashtra's State Weapon Dandpatta ) केले आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या जयंतीनिमित्त दांडपट्टा हे राज्य शस्त्र म्हणून घोषीत केल्याची माहिती दिली. दांडपट्टा (Dandpatta ) हे शिवकालीन हत्यार आहे. ज्याचा लढाई, युद्धकला, स्वसंरक्षण आणि सांस्कृतिक कार्यक्रमात ऐतिहासीक शस्त्र म्हणून वापर केला जातो. महाराष्ट्राची संस्कृती आणि शिवकालीन इतिहास या दृष्टीने पाहता या शस्त्रास विशेष महत्त्व आहे. शिवकालीन लढाईची साक्ष आणि शस्त्रवापराची त्या काळातील मावळ्यांकडे असलेली निपूणता याची जाज्वल्य साक्ष हे हत्यार देते. जाणून घ्या राज्य शस्त्र दांडपट्टा महत्त्व, इतिहास आणि वापर.
'दांडपट्ट्यास राज्यशस्त्राची पदवी देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य'
सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (19 फेब्रुवारी) आग्रा किल्ल्यात शिवजयंती उत्सवात दांडपट्टा हे राज्य शस्त्र म्हणून घोषित करण्यास मान्यता दिली. शिंदे यांच्याशिवाय आग्रा कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मुनगंटीवार उपस्थित होते. पुढे बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी सांगिले की, दांडपट्टा हे मराठा इतिहासात खोलवर रुजलेले एक वैशिष्ट्यपूर्ण शस्त्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात या शस्त्राची भूमिका आणि महत्त्व पाहता त्याचा सन्मान होणे आवश्यक होते. दांडपट्ट्यास राज्यशस्त्राची पदवी देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे, असेही ते म्हणाले. (हेही वाचा, State Weapon Of Maharashtra: महाराष्ट्र राज्य सरकार कडून दांडपट्टाला 'राजशस्त्र'ची मान्यता; 394 व्या शिवजयंती दिनी घोषणा)
शिवकालीन साधणे, इतिहास आणि पुस्तकांमध्ये दांडपट्ट्याचा उल्लेख
शिवकालीन इतिहास, साधणे आणि तत्कालीन शस्त्रास्त्रांमध्ये दांडपट्ट्याचा उल्लेख आढळतो. रशियन अभ्यासक आणि इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकांमध्येही दांडपट्ट्याचा उल्लेख आढळतो. तसेच, त्याची नाविन्यपूर्णता, तो चालविण्यासाठी आवश्यक निष्णातता, युद्धातील उपयुक्तता यांवरही इतिहासात अनेक दाखले आहेत.
दांडपट्टा आणि ऐतिहासिक महत्त्व
दांडपट्ट्याच्या ऐतिहासिक महत्त्वाबद्दल सांगताना अभ्यासकांनी म्हटले आहे की, हे एक घातक शस्त्र आहे. ज्याचा वापर शत्रूवर विशिष्ट अंतर ठेऊन चाल करण्यासाठी केला जातो. याचे वैशिष्ट्य असे की, हे हत्यार गर्दीच्या वेळी (लढाई) एकाच वेळी अनेकांना गुंतवूण ठेऊ शकते. रचना: या शस्त्राची रचनाही मोठी वैशिष्ट्यपूर्ण असते. या शस्त्रामध्ये सामान्यत: लांब स्टीलच्या पात्याचा (ब्लेड) समावेश असतो. हे पाते धातूच्या मुठीला जोडलेले असते. ही मुठही कवच असलेली असते. ज्यामुळे शस्त्र चालवणाऱ्या व्यक्तीच्या हाताचा पंजा आणि मूठ सुरक्षीत राहते.