Cyclone Nisarga Update: गोव्यापासून 310 किमी दूर आहे कमी दाबाचे क्षेत्र; पुढील 24 तासांमध्ये निसर्ग चक्रीवादळ धारण करेल रौद्र रूप, जाणून घ्या सध्याची स्थिती
Cyclone Nisarga Update (संग्रहित संपादित प्रतिमा)

सध्या गोवा, महाराष्ट्र व गुजरातला निसर्ग चक्रीवादळाचा (Cyclone Nisarga) धोका वर्तवण्यात आला आहे. आता अरबी समुद्रावरील (Arabian Sea) दाबाचा पट्टा (Depression) अक्षांश 14.2 ° N आणि रेखांश 71.2°E च्या जवळ, पणजी (गोवा) च्या नैऋत्येकडे 310 किमीवर सरकला आहे, म्हणजेच गोव्यापासून 310 किमी अंतरावर हा दाबाचा पट्टा आहे. पुढील 12 तासांदरम्यान हा दाब त्रीव्र वाढून, त्यानंतरच्या 24 तासांमध्ये पूर्वपश्चिम अरबी समुद्रावर चक्रीय वादळाची तीव्रता आणखी वाढणार आहे. दक्षिणपूर्व आणि लगतच्या पूर्वकेंद्रित अरबी समुद्रावरील असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे, पूर्वोत्तर व त्यालगतच्या नैऋत्य अरबी समुद्रावर वादळाची तीव्रता वाढत आहे. हे वादळ अतिशय वेगाने उत्तर-वायव्य दिशेने सरकले आहे.

आज पूर्वपश्चिम आणि लगतच्या नैऋत्य अरबी समुद्रावर वादळाची तीव्रता वाढेल. सुरूवातीस 2 जून रोजी पहाटे उत्तरेकडे हे वादळ सरकेल व नंतर वळून ते उत्तर-ईशान्येकडे जाईल आणि 3 जून रोजी उत्तर महाराष्ट्र, हरिहरेश्वर (रायगड) व दक्षिण गुजरात, दमण ओलांडून पुढे जाण्याची शक्यता आहे.

वाऱ्याचा वेग –

यावेळी हळूहळू गेल वेगाची गती 60-70 किमी प्रतितास वेगाच्या वेगाने 80 किमी प्रति तासापर्यंत वाढत जाईल. 2 जून सकाळपासून पूर्व केंद्रीय अरबी समुद्र व दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीसह पुढे महाराष्ट्र किनाऱ्यालगत अरबी समुद्राच्या (रायगड, मुंबई, पालघर, ठाणे) ठिकाणी 105-115 किमी प्रतितास वेगाच्या वेगाने 125 किमी प्रति तासापर्यंत वाढत जाईल. (हेही वाचा: महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी; 3 व 4 जून रोजी मुंबई, ठाणेसह 'या' जिल्ह्यांना Red Alert जारी)

वापसाचा अंदाज - 

या वादळामुळे 1 जून रोजी गोवा व दक्षिण कोकणात पावसाची शक्यता आहे. बर्‍याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, काही ठिकाणी मुसळधार ते अगदी मुसळधार पाऊस आणि उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात 3 व 4 जून 2020 रोजी अतिवृष्टीसह पावसाची शक्यता आहे.

3 जून रोजी- पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार व नाशिक आणि 4 जून – नंदुरबार, धुळे व पालघर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून, या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.

या ठिकाणी पाहू शकता या चक्री वादळाबाबत संपूर्ण माहिती

निसर्ग चक्रीवादळ 1 ते 4 जून दरम्यान नॉर्थ महाराष्ट्र आणि गुजरात येथे घोंघावणार आहे. या दोन्ही राज्याच्या किनारपट्टीवरुन निसर्ग चक्रीवादळ जाणार आहे. महाराष्ट्राला 720 किमीचा किनारपट्टा लाभला असून तो ठाणे, रायगड, ग्रेटर बॉम्बे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असा आहे.  दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र, गोवासह पश्चिम किनारपट्टीवर 4 जून पर्यंत मच्छिमारांना न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र किनारपट्टी व ईशान्य अरबी समुद्र, लक्षद्वीप क्षेत्र आणि केरळ किनारपट्टीवर मच्छिमाऱ्यांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.