Currency Note Press in Nashik: नाशिक करन्सी नोट प्रेस येथून पाच लाख रुपये गायब
Currency Note | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

नाशिक येथील करन्सी नोट प्रेस (Currency Note Press in Nashik) म्हणजेच नोट छापाई मुद्रणालयातून तब्बल पाच लाख रुपये गायब झाले आहेत. करन्सी नोट प्रेसमध्ये (Currency Note Press) अत्यंत कडेकोट बंदोबस्तात नोटछापाई सुरु असते. असे असतानाही इतकी मोठी रक्कम गायब झाल्याचा प्रकार पुढे आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. प्रशासनासही गर्भगळीत झाले असून, या सर्व प्रकाराबाबत लवकरच पोलिसांत गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे समजते. प्राप्त माहितीनुसार, 500 रुपये मूल्य असलेल्या नोटांचे 10 बंडल गायब झाल्याचे समजते. हे बंडल गायब झाले आहेत की, प्रशासनाच्याच नजरचुकीने इतर ठिकाणी गेले आहे याबाबत सध्या शोध सुरु असल्याचे समजते.

दरम्यान, संबंधित प्रकार दोन आठवड्यापूर्वी उघडकीस आला होता. याबबत पोलिसांमध्ये अद्याप कोणत्याही प्रकारची तक्रार अथवा गुन्हा दाखल नाही. करन्सी नोट प्रेस प्रशासन या प्रकाराची विभागांतर्गत गोपनीय चौकशी करत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, लवकरच या धक्कादायक प्रकाराबाबत गुन्हा दाखल होणार असल्याचे समजते. (हेही वाचा, Lasalgaon APMC Turnover: लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1315 कोटी रुपयांची उलाढाल, एैन लॉकडाऊनमध्ये एकट्या कांद्याने मारलं 939 कोटी रुपयांचं मार्केट)

नाशिक करन्सी नोट प्रेस बाबत एक इतिहासही सांगितला जातो. ब्रिटीशांनी त्यांच्या काळात 1924 मध्ये नाशिक येथील करन्सी नोट प्रेस सुरु केली. या प्रेसमध्ये 1925 पासून पोस्टल स्टेशनरी आणि स्टॅम्पची प्रिंटींग सुरु झाली. त्यानंतर 1928 मध्ये पहिल्यांदा भारतात पाच रुपयांची चलनी नोट छापण्यात आली. ही नोट या छापखान्यात छापण्यात आली. भारतात संपूर्ण भारतीय बनावटीचे चलनी नोट छापण्याची ही सुरुवात होती. 1980 पर्यंत अत्यंत सुरक्षेत नोटा छापण्याचे काम इथे सुरु होते. त्यानंतर चलनी नोटां छापण्याचे काम जोमाने सुरु झाले. त्यामुळे भारत सरकारेन नोटछापाई विभागाला स्वत:पासून वेगळे केले. त्यामुळे 10 फेब्रुवारी 2006 सेक्युरीटी प्रिंटिंग-मिटींग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड स्थापन करण्यात आली. सध्या ही संस्था केंद्रीय अर्थमंत्रालयांच्या कक्षेत काम करते.