CST Bridge Collapse | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

CST Bridge Collapse: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन (CST ) जवळ पूल कोसळून घडलेल्या दुर्घटनेस जबाबदार ठरवण्यात आलेल्या ऑडिटर आणि 3 अभियंत्याना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुले ऑडिटर नीरज देसाई( Structural Auditor Neeraj Desai), कार्यकारी अभियंता अनिल पाटिल (Anil Patil), सहाय्यक अभियंता संदीप काकुल्ले (Sandip kakulte) आणि मुख्य अभियंता (पुल विभाग) शीतल प्रसाद कोरी (Sheetala Prasad Kori) हे चौघे 9 महिन्यांनंतर तुरुगांबाहेर आले आहेत. नीरज देसाई आणि अन्य तिघांना 50-50 हजार रुपयांच्या खासगी मुचलक्यावर हा जामीन देण्यात आला. न्यायमूर्ती संदिप शिंदे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत जेष्ठ वकील दिपक साळवी यांनी आरोपींची बाजू मांडली. ही बाजू ऐकल्यावर न्यायालयाने जामीन दिला.

सीएसएमटी जवळील पूल कोसळून दुर्घटना 14 मार्च 2019 या दिवशी घडली होती. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला होता तर, तीस पेक्षाही अधिक लोक जखमी झाले होते. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) प्रशासनाने केलेल्या प्राथमिक चौकशीत हे चारही लोक दोषी आढळले होते. सेफ्टी ऑडिट करताना निष्काळजी आणि बेजबाबदारपणा दाखवल्याचा या चौघांवरही ठपका ठेवण्यात आला होता.त्यानंतर पोलीसांनी अटक करु या चौघांना ताब्यात घेतले होते.

नीरज देसाई यांनी दुर्घटना घडलेल्या पूलाचे ऑडिट केले होते. तर, कार्यकारी अभियंता अनिल पाटिल, सहायक अभियंता संदीप काकुल्ले आणि मुख्य अभियंता (पुल विभाग) शीतल प्रसाद कोरी हे महापालिकेचे अभियंता होते. या चौघांनाही भारतीय दंड संहिता कलमान्वये अटक करण्यात आली होती. (हेही वाचा, मुंबई सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटना: राजकीय नेते काय म्हणाले पाहा)

एएनआय ट्विट

दरम्यान, नीरज देसाई यांनी आपले वकील दीपक साळवी यांच्या माध्यातून न्यायालयासमोर बाजू मांडली. या देसाई यांनी दावा केला की, आपण पुलाचे ऑडीट पूर्ण केल्यानंतर पुलाचे सौदर्यीकरण करण्यात आले होते. या वेळी पुलावर ग्रॅनाईटचे खांब उभारण्यात आले. त्यामुळे पुलाचे वजन वाढले आणि पूल कोसळला. 300 किलो इतके लोकांचे वजन पेलण्याची पुलाची क्षमता होती. मात्र, त्यावर खांब उभारल्याने 14,000 किलोग्रॅम इतक्या वजानाच अतिरीक्त भार पुलावर पडला. त्याचा परीणाम पुल कोसळण्यात झाला, असा दावा देसाई यांच्या वकीलांनी न्यायालयात केला.