सीएसएमटी ते पनवेल दरम्यान लोकल आता दर अडीच मिनिटांनी धावणार
Mumbai locals | File Image | (Photo Credits: PTI)

हार्बर लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाना आता लवकरच दिलासा मिळणार असून सीएसएमटी- पनवेल दरम्यान दर अडीच मिनिटांनी लोकल धावणार आहेत. यानुसार लोकलच्या एकूण 4500 फेऱ्या होणार आहेत. परंतु सध्या दिवसभरात जवळजवळ 3 हजार फेऱ्या हार्बर लोकलने होत असतात. तर सीबीटीसी सेवेची पूर्णपणे अंमलबजावणी झाल्यानंतर लोकल दर अडीच मिनिटांनी धावणार आहेत. यामुळे प्रवाशांना गर्दीचा त्रास सुद्धा सहन करावा लागणार नाही. सीबीटीवी यंत्रणेच्या माध्यमातून लोकलसाठी लावण्यात येणारे सिग्नल यांची सुद्धा गरज भासणार नाही आहे. कारण सीबीटीवी यंत्रणेमध्ये सर्व सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे शक्य असते. तसेच लोकला वेग वाढणे आणि रेल्वे ट्रॅकचे अंतर सुद्धा कमी होणार आहे.

सध्याची लोकलसाठी सिग्नल यंत्रणा ही जुन्या पद्धतीची आहे. त्यामुळे ही यंत्रणा बदलून नवी यंत्रणाची गरज असल्याचे एका रेल्वे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे. सीबीटीसी ही एक अत्याधुनिक यंत्रणा असून त्यामध्ये सिग्नल यंत्रणा रेल्वे ट्रॅकच्या आधारे चालवली जाते. तसेच लोकल किती किमी अंतरावर आहे हे सुद्धा या यंत्रणेद्वारे चालकाला समजू शकणार आहे.मात्र सीबीटीसी ही यंत्रणा अधिक महाग असून ती मुंबईत सुरु करण्यासाठी 6 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यामुळे लोकलचा वेग वाढवू किंवा कमी सुद्धा करता येणार आहे. तर या यंत्रणेचा अधिक अभ्यास करण्यासाठी एका सल्लागाराची गरज असल्याचे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.(Mumbai Local Ladies' Special: मध्य रेल्वेवर धावणार CSMT- Panvel, CSMT- Kalyan या दोन नव्या महिला विशेष लोकल)

तसेच कल्याण आणि पनवेल ही मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील गर्दीची स्थानके म्ह्णून ओळखली जातात. साहजिकच या ठिकाणी महिला प्रवाशांची संख्या सुद्धा अधिक आहे. हीच बाब लक्षात घेत  मध्य रेल्वेने या दोन गाड्या सुरु केल्या आहेत. यापूर्वी, मध्य रेल्वेवर सकाळी कल्याण वरून सीएसएमटी कडे जाणारी आणि आणि संध्याकाळी सीएसएसमटी वरून कल्याण कडे जाणाऱ्या लेडीज स्पेशल ट्रेन आहेत.तर हार्बर मार्गावर सुद्धा सकाळी आणि संध्याकाळी सीएसएमटी- पनवेल तर ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल या लेडीज स्पेशल गाड्या आहेत. यासोबतच  या नव्या दोन ट्रेन्स देखील 5 नोव्हेंबर पासून धावण्यास सुरुवात झाली आहे.