CSMT Railway Stations: मुंबईचे प्रतिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) चा पुढील अडीच वर्षात कायापालट होणार आहे. नवी दिल्ली, अहमदाबाद आणि मुंबईच्या सीएसएमटीच्या पुनर्विकासासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने 10,000 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, अत्याधुनिक सेवांसह प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी शासन वेगाने प्रयत्न करत आहे. सध्या 199 स्थानकांचे पुनर्बांधणीचे काम सुरू असून, त्यापैकी 47 स्थानकांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. उर्वरित स्थानकांच्या पुनर्बांधणीबाबत मास्टर प्लॅनिंग आणि डिझाइनअंतर्गत अभ्यास सुरू असल्याचे कॅबिनेट बैठकीत सांगण्यात आले आहे. तसेच 32 स्थानकांचे काम सध्या वेगाने सुरू झाल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले आहे.
सीएसएमटी हे देशातील सर्वात जुने रेल्वे स्थानक आहे, हे शहरातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक मानले जाते, ज्यामध्ये 18 प्लॅटफॉर्म आहेत. त्यापैकी सात प्लॅटफॉर्म उपनगरीय सेवांसाठी आहेत आणि उर्वरित लांब पल्ल्याच्या गाड्या चालवण्यासाठी आहेत. रेल्वे अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, सीएसएमटीची सध्या दररोज सरासरी 10.97 लाख प्रवासी प्रवास करतात. देशाच्या उत्तर, पूर्व आणि दक्षिणेकडील भागांना जोडणार्या सुमारे शंभर लांब पल्ल्याच्या गाड्यांसह दररोज 1,500 हून अधिक गाड्या CSMT येथे संपतात. (हेही वाचा -
दरम्यान, पहिल्या टप्प्यात दररोज 50 लाख लोकसंख्या असलेल्या 199 स्थानकांचा पुनर्विकास करण्याचे नियोजन आहे, तर 47 स्थानकांसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. तर 32 स्थानकांवर काम सुरू आहे, असे वैष्णव म्हणाले. नवी दिल्ली स्थानकाचा पुनर्विकास साडेतीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून सीएसएमटी आणि अहमदाबादचा पुनर्विकास अडीच वर्षांत केला जाईल. रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, डिझाइनमध्ये सर्व प्रवासी सुविधा एकाच ठिकाणी, किरकोळ विक्रीसाठी जागा, कॅफेटेरिया आणि मनोरंजनाच्या सुविधा असतील.