
COVID19 Vaccination:कल्याण-डोंबिवली महापालिकेने गणेशोत्सवादरम्यान लसीकरण केंद्र बंद राहणार आहे असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांची लसीकरणासाठी गैरसोय होणार आहे. एकूण पाच दिवस लसीकरण केंद्रावर लस दिली जाणार नसल्याचे ही महापालिकेने जाहीर केले आहे. सर्वत्र गणेशोत्सवाचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या सणासुदीच्या काळात नागरिकांची लसीकरणासाठी गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी 10,11.14. 16 आणि 19 सप्टेंबरला लसीकरण बंद राहणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांनी या सुचनेकडे लक्ष देत लसीकरण केंद्रावर येऊ नये.(Covid-19 Third Wave: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंबंधित केलेल्या वक्तव्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांचे स्पष्टीकरण)
तसेच गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी गर्दी करु नये असे आवाहन ही कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून करण्यात आले आहे. तर ठाण्यात सुद्धा गणेशोत्सवादरम्यान लसीकरण बंद राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.(नालासोपारा येथे लसीकरणाच्या श्रेयवादावरुन शिवसेना-बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा)
दरम्यान, कोरोनाची तिसरी लाट येण्यााच्या पार्श्वभुमीवर लसीकरणाचा वेग वाढण्यात आला आहे. तर याच मोहिमेत आता महाराष्ट्रात लसीकरणाने रेकॉर्ड ब्रेक केला आहे. बुधवारी राज्यात रात्री 8 वाजेपर्यंत 14,39,804 नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत देण्यात आलेल्या लसीकरणातील लसींच्या डोसचा आकडा 6 कोटी 55 लाखांवर गेला आहे. राज्य सरकार तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयारी करत असून लसीकरण हे त्यांचे सर्वाधिक महत्वाचे लक्ष्य आहे.