नालासोपारा येथे लसीकरणाच्या श्रेयवादावरुन शिवसेना-बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
Covid 19 Vaccination | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

Nalasopara Vaccination: कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी लसीकरण मोहिम वेगाने चालवली जात आहे. त्याचसोबत नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर नालासोपारा येथे शिवसेना (Shiv Sena) आणि बहुजन विकास आघाडीच्या (Bahujan Vikas Aaghadi) कार्यकर्त्यांमध्ये लसीकरणाच्या श्रेयवादावरुन बाचाबाची झाल्याचे समोर आले आहे. तर वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत मोठी लसीकरण मोहिम राबण्यात आली होती. त्याच वेळी हा राडा झाला आहे.(Covid-19 Update in Mumbai: आज मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 500 पार; 4 रुग्णांनी गमावला जीव)

नालासोपारा पश्चिमेकडील सारस्वत हॉलमध्ये लसीकरण मोहिम राबवण्यात आली होती. याच दरम्यान शिवसेना-बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांमध्ये वाद होत आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली. तर शिवसेनेकडून त्यांना महापालिकेने लसी दिल्या असल्याचे म्हटले जात होते. परंतु विरोधकांनी असे म्हटले की, जर त्यांच्याकडे यासंदर्भातील पत्र असेल तर ते दाखवावे. अन्यथा ते नसल्यास त्यांच्या विरोधात कठोर कार्यवाही करावी अशी मागणी सुद्धा केली आहे.(Covid-19 Third Wave: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंबंधित केलेल्या वक्तव्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांचे स्पष्टीकरण)

दरम्यान, कोरोनाची तिसरी लाट येण्यााच्या पार्श्वभुमीवर लसीकरणाचा वेग वाढण्यात आला आहे. तर याच मोहिमेत आता महाराष्ट्रात लसीकरणाने रेकॉर्ड ब्रेक केला आहे. बुधवारी राज्यात रात्री 8 वाजेपर्यंत 14,39,804 नागरिकांना लस देण्यात आली आहे.  त्यामुळे आतापर्यंत देण्यात आलेल्या लसीकरणातील लसींच्या डोसचा आकडा 6 कोटी 55 लाखांवर गेला आहे. राज्य सरकार तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयारी करत असून लसीकरण हे त्यांचे सर्वाधिक महत्वाचे लक्ष्य आहे.