Covid-19 Third Wave: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंबंधित केलेल्या वक्तव्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांचे स्पष्टीकरण
Mumbai Mayor Kishori Pednekar (Photo Credits: Twitter)

'मुंबईत (Mumbai) कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) आली आहे', असं म्हणणाऱ्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले आहे. "कोरोनाची तिसरी लाट दारावर येऊन पोहोचली आहे. असं मी म्हटलं होतं. पण काही चॅनल्सने ते कापून दाखवले. त्यामुळे मुंबई कोरोनाची तिसरी लाट आली आहे, असं नागरिकांपर्यंत पोहचलं. महाराष्ट्राचे मंत्री नितीन राऊत म्हणाले होते की, नागपूरमध्ये तिसरी लाट आली आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट दारापर्यंत आली आहे. परंतु, मुंबईकरांनी घाबरू नका. ही लाट टाळण्यासाठी लसीकरणाची संख्या वाढवण्यात आली आहे," अशा शब्दांत त्यांनी आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

न्यूज एजन्सी एएनआयनुसार, एक दिवस आधी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या होत्या की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपल्याला खूप काही शिकायला मिळाले. मी कुठेच जात नाहीये कारण कोरोनाची तिसरी लाट येत नसून आली आहे. निर्बंध घालण्याचा हक्क राज्य सरकारला आहे. गरज असल्याचा मुख्यमंत्री निर्णय घेतील. नागरिकांना विनंती आहे की त्यांची आपली काळजी घ्यावी. (Covid-19 Third Wave: मुंबईमध्ये आली कोरोना विषाणूची तिसरी लाट; गणेशोत्सवात काळजी घेण्याचे Mayor Kishori Pednekar यांचे आवाहन)

ANI Tweet:

मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. सप्टेंबरच्या सहा दिवसांत झालेली रुग्णनोंद मागील महिन्यात झालेल्या रुग्णनोंदी पेक्षा 28 टक्के अधिक आहे. तसंच हा गणेशोत्सवाचा काळ असल्याने रुग्णवाढ मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. त्यामुळे गणेशोत्सवासाठी नियमावली जारी करण्यात आली असून नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येता आहे.