कोरोना विषाणूच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेनंतर देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (Covid-19 Third Wave) धोका निर्माण झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रात आता तिसऱ्या लाटेचे आगमन झाले आहे. उद्धव ठाकरे सरकारचे मंत्री नितीन राऊत काल म्हणाले की, नागपुरात ज्या प्रकारे कोरोनाची प्रकरणे दुप्पट वेगाने वाढत आहेत ते पाहता, असे म्हणता येईल की कोरोनाची तिसरी लाट नागपुरात आली आहे व म्हणून आपण खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. दुसरीकडे, आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनीही शहरात तिसरी लाट आल्याबाबत भाष्य केले आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, 'कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून आपल्याला खूप काही शिकायला मिळाले. आता राज्यात गणेशोत्सव होऊ घातला आहे व तिसरी लाटही आली आहे. त्यामुळे मी ‘माझे घर माझा बाप्पा’ ही संकल्पना सुचवत आहे. याचा अर्थ लोकांनी आपल्या घरातील गणपती सोडून इतरत्र फिरू नये. राज्य सरकारला निर्बंध लादण्याचा अधिकार आहे. आवश्यक असल्यास मुख्यमंत्री निर्णय घेतील. लोकांना विनंती आहे की त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी.’
कोरोना की दूसरी लहर से हमें बहुत कुछ सीखने को मिला है। मैं कहीं भी नहीं जाने वाली हूं क्योंकि तीसरी लहर आ नहीं रही है आ गई है। पाबंदियां लगाने का हक तो राज्य सरकार को है। जरूरी होगा तो मुख्यमंत्री निर्णय लेंगे। लोगों से विनती है कि खुद को संभालें: मुंबई मेयर किशोरी पेडनेकर pic.twitter.com/kWsjP2BetY
— ANI_HindiNews (@AHindinews) September 7, 2021
दुसरीकडे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे की, 'केरळमध्ये ओणम सणाच्या वेळी गर्दीमुळे कोविड रुग्णांची संख्या वाढली होती. हे पाहता, राज्य सरकार गणेश विसर्जनाची तयारी करत आहे आणि लोकांना कोविडच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहनही करत आहे.’
(हेही वाचा: Colleges Reopen in Maharashtra: राज्यातील महाविद्यालयं सुरु करण्याबाबत उदय सामंत यांचे महत्त्वपूर्ण विधान)
दरम्यान, ‘कोरोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की, त्यांनी गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकता, मात्र आता आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाही, जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या,’ असे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परत एकदा केले आहे.