Image For Representation (Photo Credits: IANS)

ठाणे (Thane) जिल्ह्यात कोरोनाचा वाढता फैलाव बघता ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी आजपासून ठाणे जिल्हा, कल्याण (Kalyan), नवी मुंबई (Navi Mumbai) , मीरा भाईंदर (Mira Bhayander), या सर्व भागातील औषधांची दुकाने वगळता सर्व दुकाने ही संध्याकाळी 5 नंतर बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar) यांनी सर्व दुकानदारांना आदेश दिले आहेत. ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत 100हुन अधिक कोरोना रुग्ण आढळून आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे समजत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अजूम्ही ठाणे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी सोशल डिस्टंसिंग च्या नियमाचे पालन न करता लोक खरेदीसाठी गर्दी करत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे सर्व सुकणे आता संध्याकाळ नंतर बंद ठेवली जावीत असा निर्णय घेतला गेला आहे. ही दुकाने सकाळी 5 वाजता उघडली जातील. सकाळी 5 ते संध्याकाळी 5 या वेळात लोकांना खरेदी करता येणार आहे. Coronavirus Outbreak: धारावीला पूर्णतः लॉकडाऊन करण्याची खासदार राहुल शेवाळे यांची मागणी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुचवल्या 'या' उपाययोजना

प्राप्त माहितीनुसार, यापूर्वीच कल्याण- डोंबिवली पालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी (Dr. Vijay Suryavanshi) यांनी संपूर्ण शहरात संचारबंदी अधिक कडक करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार, 7 एप्रिलपासून शहरातील मेडिकल, रुग्णालय व दवाखाने वगळता जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.दुसरीकडे, कळवा आणि मुंब्रा परिसरात सुद्धा संपूर्ण लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. हे निर्णय लोक लॉक डाऊनचा नियम पाळत नसल्यामुळे घेण्यात आले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात दिवसागणिक कोरोनाग्रस्तांची आकडेवारी वाढतच आहे. आज घडीला, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत 60 ने वाढ झाली असून राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा आता 1078 वर पोहचला आहे. यामध्ये मुंबई महानगरपालिका क्षेत्रात यातील 44 नवे रुग्ण आढळले आहेत. तर पुणे येथे 9, नागपुर मध्ये 4, आणि अहमदनगर, अकोला, बुलढाणा येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आले आहेत.