Ajit Pawar (Photo Credit: Twitter)

पुणे शहरामध्ये दिवसागणिक कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने आज (26 मार्च) पुन्हा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी महापौर, नगरसेवक आणि अन्य अधिकार्‍यांसोबत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे. यामध्ये अजित पवारांनी पुणेकरांना नियमावलीचं पालन करण्यासाठी आवाहन केले आहे. यावेळेस येत्या काही दिवसांत कोरोनाची रूग्णसंख्या आटोक्यात आली नाही तर 1 एप्रिल नंतर लॉकडाऊन सारखे कडक निर्बंध नाईलाजास्तव घ्यावे लागतील असे सांगितले आहे. पुणे: खासगी रुग्णालयातील बेड्स रुग्णांसाठी महापालिकेकडे द्यावेत अन्यथा कारवाई करण्यास भाग पाडू नये, महापौर मुरलीधर मोहोळ यांचा इशारा.

पुणे शहारामध्येही कोरोनाचा वाढता विळखा पाहाता खाजगी हॉस्पीतलचे 50% बेड्स रिझर्व्ह कारण्याचे आदेश दिले आहेत. तसेच लसीकरणाला वेगवान करण्याचेदेखील आदेश दिले आहेत. लस कमी पडू नयेत म्हणून खासदार प्रकाश जावडेकर यांच्यासोबतही चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान बागा केवळ सकाळच्या वेळेत खुली ठेवली जातील. लग्न आणि इतर कार्यक्रमांवर कडक नियमावली आहे. राजकारण्यांनी देखील सारे कार्यक्रम देखील कमी करावेत असे सांगितले आहे. यामुळे गर्दी कमी होण्यास मदत होईल. झपाट्याने वाढणारा कोरोना पाहता आता लसीकरणासाठी वयाची मर्यादा 45 वरून 25 पर्यंत खाली आणण्याची गरज असल्याचं देखील पवार यांनी म्हट्लं आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत आता वेगाने कोरोना पसरत आहे त्यामुळे तरूण मंडळीदेखील या विळख्यात अडकत असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केले आहे. भारतात सर्वाधिक कोविडची लस देणा-या यादीत महाराष्ट्र अव्वल स्थानावर- डॉ. प्रदिप व्यास.

पुणे शहरात आज लॉकडाऊन घोषित झालेला नाही. हा निर्णय घेण्यासाठी नागरिकांची मानसिक तयारी करणं आवाश्यक आहे. इतर तयारी करण्याची, भाजीपाला, धान्य यांची साठवणूक करण्यासाठी वेळ दिला आहे. सध्या हॉटेल बंद नाही पण लोकांनी घरीक अन्न मागवावं पण येत्या काही दिवसांत कडक नियम लावल्यास ते देखील बंद केले जातील. मॉल सध्या 50% क्षमतेने सुरू राहणार आहे.

पुणे शहरात काल रात्री गेल्या 24 तासात 6,432 जणांना कोरोना संक्रमण झाले आहे. 2,808 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर 42 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पुणे महापालिकेने दिली आहे.