Murlidhar Mohol (Photo Credits-ANI)

Coronavirus In Pune: कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा गेल्या काही दिवसांपासून वाढत चालला आहे. अशातच आता पुण्यातील खासगी रुग्णालयातील बेड्स हे कोरोनाच्या रुग्णांसाठी महापालिकेकडे द्यावेत अशा सुचना दिल्या आहेत. अन्यथा कारवाई करण्यास भाग पाडू नये असा सुद्धा इशारा पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.(मुंबई: लोकलची गर्दी टाळण्यासाठी खासगी कार्यालयांमध्ये कर्मचा-यांचा उपस्थितीबाबत BMC दिले 'हे' आदेश) 

कोरोनाच्या रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी बेड्स उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वारंवार हेल्पलाईन क्रमांकावर येत आहेत. त्यामुळेच रुग्णांसाठी बेड्स उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. पुण्यातील शहरांमध्ये तीन हजारांच्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यापैकी 100 हून अधिक जणांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहेत. ऐवढेच नाही तर काही रुग्णांना ऑक्सिजनची सुद्धा गरज भासत असल्याने आता खासगी रुग्णालयांना त्यांच्या ताब्यातील बेड्स देण्याच्या सुचना दिल्या गेल्या आहेत.(Maharashtra: नागपूर मध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने काही रुग्णालयात बेड्सची कमतरता)

दरम्यान, पुणे जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यासंदर्भातील निर्णय आज होण्याची शक्यता आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत लॉकडाऊन संदर्भातील निर्णय होऊ शकतो. दुसऱ्या बाजूला मुंबईत सुद्धा कोरोनाच्या रुग्णांचा आकडा अधिक वाढत आहे. त्यामुळे होळीच्या सणानिमित्त निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच नागरिकांनी सुद्धा नियमांचे पालन करावे असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे.

तर काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी पत्रकार परिषदेत देशभरातील कोरोना रुग्णसंख्येत सर्वाधिक अॅक्टीव्ह असलेल्या 10 जिल्ह्यांची यादी सांगितली. यात धक्कादायक बाब अशी की या 10 पैकी नऊ जिल्हे हे महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही नक्कीच चिंताजनक बाब आहे. ही माहिती चिंताजनक असली तरी घाबरुन न जाता काळजी घेणे आवश्यक आहे.