प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

Maharashtra: नागपूर येथे कोरोनाच्या रुग्णांमध्ये गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयातील बेड्सची कमतरता भासू लागली आहे. अशातच नागपूर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येक प्रयत्न केला जात आहे की, नागरिकांना वेळीच रुग्णालयात बेड्स मिळावे. मात्र हे सर्व प्रयत्न कुठेतरी फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे.(भारतामध्ये सर्वाधिक कोरोना लस देण्याच्या यादीत महाराष्ट्र अव्वल स्थानी, डॉ. प्रदिप व्यास यांनी दिली माहिती)

रुग्णालयात बेड्सची टंचाई भासत असल्याने वैद्यकिय अधीक्षक यांनी असे म्हटले आहे की, बेसमेंटमधील 600 पैकी 90 बेड्स हे ड्रेनेजच्या कारणास्तव बंद आहेत. त्यामुळे हायकोर्टाकडून परवानगी मिळाल्यानंतरच ते रिपेअर करता येणार आहेत. परंतु कालपासून रुग्णांना बेड्स दिले जात असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.(Mumbai: रहिवाशी इमारतीत लसीकरण मोहिम राबवण्याचा महापालिकेचा विचार)

Tweet:

नागपूरात कोरोनाचा ऐवढा उद्रेक झाला आहे की, लोकांना रुग्णालयात बेड्स मिळणे दूरच पण सोशल मीडियाचा त्यांना आधार घ्यावा लागत आहे. ज्या लोकांना डिस्चार्ज दिल्यानंतर दुसऱ्या रुग्णाला बेड मिळाल्याने तो स्वत:ला भाग्यवान समझत आहे. दुसऱ्या बाजूला खासगी रुग्णालयाने असे म्हटले आहे की, आता रुग्ण हे स्ट्रक्चरवर सुद्धा झोपण्यास सुरुवात केली आहे. या व्यतिरिक्त प्रायव्हेट रुम ही बंद केले गेले आहेत. त्यामुळे अन्य लोकांना जागा मिळू शकते.(Coronavirus in Maharashtra: घाबरु नका पण काळजी घ्या, कोरोना रुग्णसंख्येत सर्वाधिक अॅक्टिव्ह असलेल्या 10 जिल्ह्यांपैकी नऊ महाराष्ट्रात)

दरम्यान, प्रत्येक खासगी रुग्णालयात 20 ते 25 रुग्णांची वेटिंग लिस्ट लागली आहे. रुग्णालयात वेंटिलेटरचा सुद्धा तुटवडा भासू लागला आहे. त्याचसोबत खासगी रुग्णालयात रुग्णांकडे लक्ष देण्यासाठी पुरेसे कर्मचारी सुद्धा नाही आहेत. जिल्हा प्रशासनाने खासगी रुग्णालयांना अशा सुचना दिल्या आहेत की, कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांना नाकारण्याऐवजी त्यांच्यावर उपचार करा.